Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

Gold Price Mumbai : आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,९३० प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जाणून घ्या देशातल्या प्रमुख शहरांमधले ताजे दर.
Gold Rates Jump This Week
Gold Rates Jump This Weekgoogle
Published On

आठवड्याभरात सोनं- चांदीच्या दरात मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १८०० रुपयांनी वाढला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १६५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर आज २६ जुलै २०२६ रोजी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,९३० प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,८५० प्रति ग्रॅम इतका आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणारे आणि दागिने खरेदीची योजना करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष पून्हा बाजाराकडे लागलं आहे.

Gold Rates Jump This Week
Fatty Liver : लिव्हर खराब झाल्यास काय खावे? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती

राजधानी दिल्लीमध्ये Goodreturn नुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४५,०८० प्रति १० ग्रॅम असून २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३३,००० प्रति ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,४५,०९० प्रति १० ग्रॅम तर २२ कॅरेटचा भाव १,३३,००० आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,९८० तर २२ कॅरेटचा दर १,३२,८५० प्रति १० ग्रॅम आहे.

दरम्यान, २४ जुलै रोजी दिल्लीमध्ये सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीत २००० ची घसरण होऊन भाव १,४७,२०० प्रति १० ग्रॅमवर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा बाजारात तेजीचे संकेत दिसले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत ४,०५२.७८ डॉलर प्रति औंस इतकी नोंदवली गेली आहे.

चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर १०,००० प्रति किलोने वाढला असून आज २६ जुलै रोजी चांदीचा भाव २,४०,००० प्रति किलो इतका झाला आहे.

Gold Rates Jump This Week
Takla Bhaji Recipe: टाकळ्याची भाजी कशी ओळखायची?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com