Sakshi Sunil Jadhav
टाकळ्याची भाजी ही पावसाळ्यात उगवणारी सगळ्यात पौष्टीक रानभाजी आहे. ही शेताच्या बांधावर, जंगलाच्या कडेला आणि मोकळ्या जागेत नैसर्गिकरित्या उगवते.
ज्या भाजीची पाने हिरवी गार असतात. ज्यांना पिवळी फुलं असतात. तर ज्यांना मध्यम आकाराच्या शेंगा असतात ही पाने टाकळ्याच्या भाजीची असतात. टाकळ्याची पाने ही कोवळीच भाजीसाठी चांगली असतात.
टाकळ्याची कोवळी पाने, कांदा, ५ ते ६ लसूण पाकळ्या , २ हिरव्या मिरच्या, किसलेले खोबरं, मीठ, तेल आणि मोहरीची फोडणी इ.
सर्वप्रथम टाकळ्याची भाजी बारीक चिरून घ्या. सोबत कांदाही चिरून घ्या.
आता एक कढईत तेल गरम करून मोहरीची फोडणी द्या.
फोडणीमध्ये लसूण, कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.
आता चिरलेल्या टाकळा घालून मंद आचेवर शिजवा. मग त्यांनतर चवीनुसार मीठ घाला.
शेवटी ताजं किसलेलं खोबरं घालून हलकं मिक्स करा आणि भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.