Sakshi Sunil Jadhav
ज्वारी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. पण नाश्त्यात आपण ज्वारीचा वापर करत नाही. कारण ज्वारीची भाकरीच आपल्या घरात बनवली जाते.
तुम्ही नाश्त्यासाठी ज्वारीच्या पिठापासून हेल्दी ब्रेड्स सुद्धा बनवू शकता. याची पुढे सोपी रेसिपी आणि साहित्य दिलं आहे.
२ कप ज्वारीचं पीठ, ३ मोठे चमचे इसबगोल, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मध, १ चमचा बेकिंग सोडा, १ मोठा चमचा व्हिनेगर, २ कप दूध, मिक्स सिड्स इ.
सर्वप्रथम कढई किंवा कुकर १० ते १५ मिनिटं गरम करून घ्या. मग त्यामध्ये पीठ, इसबगोलस, मीठ, मध आणि खाण्याचा सोडा घालून चांगलं मिक्स करून घ्या.
आता मिश्रणात हळूहळू दूध घाला. व्हिनेगर घालून परत चांगलं मिक्स करून घ्या.
पुढे मिश्रण तयार झाल्यावर ते २ ते ३ मिनिटं झाकून ठेवा. त्याने इसबगोल त्यामध्ये चांगला शोषून जाईल.
पुढे बटर पेपर लावलेल्या बेकिंग डिशमध्ये मिश्रण ओतून घ्या. मग त्यावर मिक्स सिड्स टाका.
शेवटी डबा गरम केलेल्या पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवा आणि स्लो फ्लेमवर ४० ते ४५ मिनिटं शिजवा. ब्रेड थंड झाल्यावर ते कापून सर्व्ह करा.