Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात अनेकजण पावसात भिजतात. त्यानंतर काही लोकांना सतत सर्दी, खोकला किंवा ताप येण्याची समस्या जाणवते.
पावसात भिजल्यानंतर थंड पाणी टाळा. दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
संत्री, मोसंबी, आवळा आणि पेरू यांसारखी फळं आहारात घ्या. यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होऊ शकते.
शिळे किंवा बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा घरचे ताजे आणि गरम जेवण खाणे जास्त चांगले ठरू शकते.
रात्री झोपण्याआधी कोमट दुधात चिमूटभर हळद घालून प्यायल्यास शरीराला आराम मिळू शकतो.
आलं, तुळस आणि काळी मिरी घालून बनवलेला गरम चहा घशाला आराम देण्यास मदत करू शकतो.
मूग, डाळी, अंडी, दूध किंवा पनीर यांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळेल.
तळलेले, जास्त तेलकट आणि फास्ट फूड कमी खा. अशा पदार्थांमुळे शरीरावर जास्त ताण येऊ शकतो. दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त ताप राहिल्यास किंवा तापासोबत अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर गंभीर लक्षणे दिसल्यास स्वतः औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांकडे त्वरित जा.
वरील माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. ती वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. वारंवार ताप येत असल्यास किंवा प्रकृती बिघडल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.