

कुठे पुतळ्याचं दहन, कुठे प्रतिकात्मक गाढवावरून धिंड तर कुठे चपलांचा महाप्रसाद.राज्यात ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसनं पुकारलेल्या आंदोलनात एक ना अनेक प्रकारे निवडणुक आयोगाच्या मनमानी कारभारावर विरोधकांनी हल्लाबोल चढवलाय. मतदार याद्यांमधील कथित फेरबदल, मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी ही राज्यभरात काँग्रेससह विरोधकांनी केलीय.
अमरावतीमध्ये युवक काँग्रेसनं आक्रमक आणि अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडलं.जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. नागपूरात तर ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याचं दहन करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.ठाण्यात तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक पुतळ्याकडून उठाबशा काढून घेतल्या.दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात ठाण्यात डमी ज्ञानेश कुमारांना गाढवावर बसवून त्यांना हारतुरे घातले.
दरम्यान कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्येही काँग्रेस कार्यकर्ते ज्ञानेश कुमारांविरोधात रस्त्यावर उतरले होते. तर दुसरीक़डे ठाकरेबंधूनी ही मुंबईत 4 ऑक्टोंबरला ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन करण्याची घोेषणा केलीय. त्यामुळे एकंदरीत, मतदार याद्यांमधील गोंधळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून विरोधकांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे निवडणुक आयोगाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालयं.. आता नैतिकतेचा भाग म्हणून ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देणार की कायद्याच्या संरक्षणाचा फायदा घेऊन आयोगाच्या कारभाराचा गाडा असाच हाकत राहणार? हे पाहणं महत्तवाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.