Eknath Khadse and Girish Mahajan Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : बटन दाबलं की दिल्ली हादरेल, भाजपमध्ये भूकंप येईल, मग दाबा बटन; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान

Eknath Khadse and Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना थेट आव्हान दिलं आहे. महाजन आज वर्धा दौऱ्यावर होते.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यांमध्ये सीडी स्कँडलवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. जुन्या मुद्यांवरून दोघांमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. सीडी स्कँडलवरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले आहेत. खडसेंच्या आरोपांना गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मंत्री गिरीश महाजन आज वर्धा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाजनांनी राजकीय घडामोडी ते सीडी स्कँडलवर भाष्य केलं. यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपाची समाचार घेतला. गिरीश महाजन म्हणाले, 'एकनाथ खडसे यांच्याबद्दल मी बोलणार नाही. कारण त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे. आता मी त्यांची मुलाखत बघत होतो. मोबाईलवर कोणीतरी मला दाखवली. खरंच मला त्यांची कीव यायला लागली आहे. मला राग येत नाही, त्यांची कीव यायला लागली आहे'.

'खडसे म्हणतात माझ्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी आहेत. माझे सर्व उतारे तपासून घ्या. माझं काहीच म्हणणं नाही. आता हे म्हणतात की मी काय करावं? तुमचा जावई तीन वर्ष जेलमध्ये राहून आला. त्यांना थोडीही फार लाज वाटत नाही. तुमच्यावर किती गुन्हे आहेत. त्यांच्यावर 36 कोटींची रॉयल्टी चोरण्याचा गुन्हा आहे. त्याची तुम्हाला काहीच लाज वाटत नाही, अशी टीका महाजन यांनी केली.

'तुमचं भोसरी प्रकरण, तुम्ही काय करता? चोऱ्या करतात, डाके टाकतात. दिल्लीला जाऊन अक्षरशः आडवे पडून पायावर पडतात. आमच्या नेत्यांच्या आणि त्यांच्याकडून इथे सूट मिळवून घेतात किंवा काय तरी करून स्टे करून घेता. हे सगळे प्रकार चाललेले आहेत. माफ करा, माफ करा, माफ करा, हा धंदा त्यांचा चाललेला आहे. मला खरंच एकनाथ खडसे यांची आता कीव यायला लागली आहे. इतक्या वायफळ बडबड करताय. लाईन सोडून बडबड करताय,असे ते म्हणाले.

'गेल्या पाच वर्षापासून बटन दाबला की असं बटन दाबलं की असं दिल्लीला जाऊन, दिल्ली हालवून जाईल. भाजपत भूकंप येईल. अरे बाबा दाबा ना बटन. मग म्हणतात, हरवलं आमचं बटन, आमचा मोबाईल हरवला. या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला काय? त्यांचे फार हाल माझ्याकडून बघवले जात नाही. त्यांना फारसा असह्य झालेले बघवत नाही. मी त्यांच्यावर फार आता काही बोलणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच गोविंदचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT