Sarfaraz Khan Diet : सरफराज खानने २ महिन्यात १७ किलो वजन कसं घटवलं? आहार काय आहे? जाणून घ्या

Sarfaraz Khan Diet In Marathi : सरफराज खानने २ महिन्यात १७ किलो वजन घटवलंय. त्याचा आहार काय आहे? जाणून घेऊयात.
Sarfaraz Khan Diet
Sarfaraz Khan Diet in Marathi Saam tv
Published On
Summary

सरफराज खानने २ महिन्यांत १७ किलो वजन घटवलं आहे.

साखर, मैदा, बिर्याणी आणि जंक फूड त्याने आहारातून वगळलं.

डाएटसोबत नियमित वर्कआउटही त्याच्या दिनचर्येत होतं.

टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खान सध्या चर्चेत आहेत. सरफराजने शतकी खेळी खेळली नसून वजन घटवल्याने चर्चेत आला आहे. सरफराजने मागील २ महिन्यात १७ किलो वजन घटवलं आहे. सरफराजने सोमवारी त्याचा फोटो शेअर केला. त्यात तो ओळखूही येईना. सरफराजने भरपूर वजन कमी केलं आहे. सरफराजने अवघ्या दोन महिन्यात वजन कमी करून दाखवलं आहे.

सरफराजचे वडील नौशाद खान यांनी याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, सरफराज खानने दोन महिन्यात सॅलड, ब्रॉकली, ग्रिल्डस फिश, ग्रिल्ड चिकन, उकडलेले अंडी खाल्ली आहेत. मात्र, त्याने साखर, मैद्याचे पदार्थ खाल्ले नाहीत. सरफरजने बिर्याणी खाणे देखील बंद केलं आहे'.

Sarfaraz Khan Diet
Mumbai Train Blast : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार

'सरफराज खानच्या वडिलांनी देखील वजन कमी केलं आहे. रेग्युलर वर्कआऊटसोबत डाएटवर देखील विशेष लक्ष केंद्रित केलं. सरफराजच्या वडिलांचं वजन १२२ किलो होतं. त्यांनी वजन घटवून १०० किलो केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला, असे सरफराजच्या वडिलांनी सांगितलं. सरफराजच्या वडिलांच्या गुडघ्याची शस्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, त्यांनी वजन कमी करण्यासाठी तारीख पुढे ढकलली.

Sarfaraz Khan Diet
Eknath Shinde : 'शेतकरी भिकारी नसून...' म्हणणाऱ्या कोकाटेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? वाचा

सरफराज खानने मागील वर्षी टेस्ट टीममध्ये डेब्यू केलं होतं. त्यांची कामगिरी देखील चांगली राहिली आहे. परंतु त्याला इंग्लंडविरोधात भारतीय संघात स्थान मिळालं नाही. सध्या सरफराजने फिटनेसवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्यामुळे सरफराजला लवकरच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Q

सरफराज खानने किती वजन कमी केलं आहे?

A

सरफराज खानने अवघ्या दोन महिन्यांत १७ किलो वजन कमी केलं आहे.

Q

त्याने कोणते पदार्थ खाणं बंद केलं?

A

सरफराजने साखर, मैदा, बिर्याणी आणि प्रोसेस्ड फूड खाणं पूर्णपणे बंद केलं.

Q

त्याच्या डाएटमध्ये काय काय समाविष्ट होतं?

A

त्याने सॅलड, ग्रिल्ड फिश, ग्रिल्ड चिकन आणि उकडलेली अंडी खाल्ले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com