
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. 'मला रमी खेळताच येत नसून तसे आढळल्यास राजीनामा द्यायला तयार असल्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं. माणिकराव कोकाटे यांच्या स्पष्टीकरणावर रोहित पवारांनी सवाल केला आहे. जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलमधील पत्त्याचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. पत्त्यांच्या गेमवरून विरोधकांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी थेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांच्या टीकेला मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. मंत्री माणिकराव कोकोटे यांच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवारांनी नवा उपस्थित केला आहे. रोहित पवारांनी 'एक्स'वर पोस्ट करत सवाल उपस्थित केले आहेत.
रोहित पवारांनी म्हटलं की, 'सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. खरंतर, उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती. पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसाव आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते. तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय'.
'आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत, त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले.
'विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होते. पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.