Affordable Living : अवघ्या १०० रुपयांमध्ये मिळतोय अलिशान बंगला; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Affordable Living in France : फ्रान्समध्ये बंगला खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. तुम्ही अवघ्या १०० रुपयांमध्ये घर खरेदी करू शकता.
France Home Scheme
Ambert France HouseSaam tv
Published On
Summary

फ्रान्सच्या Ambert शहरात १ युरोमध्ये घर मिळण्याची संधी आहे.

घरासाठी नुतनीकरण करणे आवश्यक असून, ३ वर्ष राहावे लागेल.

परदेशी नागरिकांसाठीही अर्जाची संधी उपलब्ध आहे.

स्थानिक प्रशासनाकडून नुतनीकरणासाठी कर्जाची सुविधा दिली जाते.

तुम्हाला परदेशात शांत, ऐतिहासिक ठिकाणी राहायचं स्वप्न असेल, तर फ्रान्समध्ये राहायची सुवर्ण संधी आहे. तुम्हाला फ्रान्समधील Puy-de-Dôme येथील Ambert या शहरात अवध्या १ युरोमध्ये घरे दिली जात आहेत. मात्र, एक अटक आहे. तुम्हाला घराचं नुतनीकरण करावे लागेल. तुम्हाला किमान ३ वर्षे तरी घरात राहावं लागेल.

Ambert शहर हे Lyon पासून जवळपास १३४ किलोमीटर अंतरावर आहे. या शहाराची लोकसंख्या ६५०० इतकी आहे. मात्र, या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. या शहरात ६० टक्क्यांहून अधिक घरे रिकामे आहेत. त्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढावी, यासाठी स्थानिक प्रशासनाने ५ वर्षांची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत १ युरोमध्ये घरांची विक्री केली जात आहे. लोकांची वस्ती वाढल्याने शहरात व्यवसाय वाढेल. शहरातील शाळा भरतील.

घराचं करावं लागेल नुतनीकरण

तुम्हाला ही योजना आकर्षक वाटत असेल. पण तेवढी जबाबदारी देखील मोठी आहे. . Forbes च्या रिपोर्टनुसार, तुम्हाला १०० रुपयांमध्ये बंगला खरेदी केल्यानंतर त्याचं नुतनीकरण करावं लागेल. तुम्हाला घराच्या बाहेरच्या आणि आतल्या भिंतींची डागडुजी करावी लागेल. आधुनिक जीवनशैली मानक (Modern Living Standard) नुसार घर तयार करावे लागेल.

France Home Scheme
Who is Suraj Chavan : विजय घाडगेंना मारहाण करणारे सूरज चव्हाण आहेत तरी कोण? जाणून घ्या

इटलीमध्ये सुरु असलेल्या योजनेच्या आधारावरच ही योजना फ्रान्समध्ये राबवली जात आहे. घराच्या दुरुस्तीसाठी साधारण €20000 ते €50000 (किमान १८ ते ४५ लाख) खर्च येऊ शकतो. बंगला खरेदी करणाऱ्यांना ठराविक वेळेतच ही दुरुस्ती करावी लागेल. स्थानिक नियमानुसार, बंगल्याचं नुतनीकरण करणे गरजेचे आहे.

France Home Scheme
Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर
Q

कोण करू शकतो अर्ज?

A

फ्रान्स नागरिकांसोबत इतर देशातील नागरिक देखील अर्ज करू शकतात. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

घरात कमीत कमी ३ वर्ष राहणे अनिवार्य आहे. बंगला विक्री करण्याच्या उद्देशाने खरेदी करता येणार नाही.

फ्रेंच भाषा येणे अनिवार्य नाही. परंतु भाषा येत असल्यास स्थानिक दुकानदार, अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उपयोगी ठरेल.

बंगल्यासाठी अर्ज प्रक्रिया Ambert टाऊन हॉलमध्ये केली जाणार आहे.

France Home Scheme
Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

सरकारकडूनही मदत

बंगल्याच्या नुतनीकरणासाठी स्थानिक प्रशासनाकडून कर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे खरेदीदारांना बंगल्याची चांगल्या दर्जाची दुरुस्ती करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com