Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Jagdeep Dhankhad News : जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिलाय.
Jagdeep Dhankhad.
Jagdeep DhankhadSaamTv
Published On

Jagdeep Dhankhar Resign : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख धनखड यांनी पत्रात केला आहे.

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिलाय. धनखड यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहत प्रकृतीचं कारण देऊन राजीनामा दिलाय. संविधानाच्या कलम ६७ (A) अंतर्गत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केलीये.

Jagdeep Dhankhad.
Satara Shocking : तीच मुलगी अन् तोच मुलगा, याआधीही हल्ल्याचा प्रयत्न; साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, धक्कादायक VIDEO

जगदीप धनखड यांनी पत्रात म्हटलं की, ' आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. मी राष्ट्रपतींच्या सहकार्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभर मानतो. त्याचबरोबर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानतो'.

जगदीप धनखड यांनी पुढे म्हटलं की, 'मला संसदेतील खासदारांकडून प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला, ते आयष्यभर आठवणीत राहील'. उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळाची आठवण करत म्हटले की, 'मला महान लोकशाहीत उपराष्ट्रपतीपदावर असताना लाभलेल्या अनुभव आणि दृष्टीकोनांसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे'.

Jagdeep Dhankhad.
Devendra Fadnavis : मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खुलासा केलाय, पण...; रमी प्रकरणावर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

'भारताच्या आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या काळाचा साक्षीदार होणे, माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट ठरली आहे. याचबरोबर भारताचा जागतिक उदय आणि उज्ज्वल भविष्याविषयी विश्वास व्यक्त करत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा शेवट केला.

जगदीप धनखड यांच्याआधी दोन उपराष्ट्रपती कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कृष्ण कांत यांनी २१ ऑगस्ट १९९७ रोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २७ जुलै २००२ रोजी कार्यकाळादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यामुळे ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. तर वेंकट गिरी यांनी १९६९ साली कार्यकाळ पूर्ण न करता उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com