Talegoan MIDC saam tv
महाराष्ट्र

Talegoan MIDC : दिवस 33 वा... सरकारच्या विराेधात जनरल मोटर्सच्या कामगारांचे मुंडन आंदाेलन

दिलीप कांबळे

Maval News : मावळ येथील तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सचे कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जनरल मोटर्स कामगारांनी मुंडण करुन सरकारच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

मावळात गेल्या 33 दिवसांपासून जनरल मोटर्सच्या एक हजार कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदाेलकांची काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भेट घेतली. त्यानंतरही कामगारांनी आंदाेलन मागे घेतले नाही. त्यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांनी देखील कामगारांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान कामगारांनी शासनाचा निषेध म्हणून आजपासून मुंडन आंदोलन सुरू केले आहे. इथून पुढे आंदोलन चालूच राहणार असे कामगारांनी स्पष्ट केले. सरकारने जनरल मोटर्सचे उर्वरित कामगार नामांकित कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी शासन स्तरावर कोणतीही कारवाई केली नसल्यासने कामगारांनी सरकारचा निषेध नाेंदविला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT