Maval News : सत्ताधारी उद्योग मंत्री आणि कामगार मंत्र्यांना नामांकित कंपनीशी बोलण्यास वेळ आहे, पण कामगारांशी बोलायला वेळ नाही. हे सरकार उद्योगपतींसाठी आहे, की कामगारांसाठी असा प्रश्न युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati latest marathi news) यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra News)
तळेगाव येथे सुरू असलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांच्या साखळी उपोषणस्थळी राजेंनी भेट दिली. उपाेषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजेंनी कामगारांना पाठिंबा देत सरकारवर टीकेची झाेड उठवली.
संभाजीराजे म्हणाले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी कामगारांना न्याय मिळावा म्हणून पत्र दिलं होते. आता त्यांची जबाबदारी आहे या कामगारांना बोलवून त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे.
दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी असे केले नाही तर मी देखील छत्रपती आणि शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार नेता आहे हे लक्षात ठेवावे. कामगारांना न्याय मिळत नसेल तर सरकारच्या विरोधात माझं कडवं आव्हान असेल असा इशारा राजेंनी सरकारला दिला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.