Kolhapur Rail Passengers Andolan : रुळावर आंदाेलन करणा-या रुकडी ग्रामस्थांना कोल्हापूरात रेल्वे पाेलीसांनी घेतले ताब्यात (पाहा व्हिडिओ)

या आंदाेलकांशी पाेलीसांनी चर्चा केली परंतु त्यातून मार्ग निघत नसल्याचे लक्षात येताच पाेलीसांनी पुढील कार्यवाही केली.
Kolhapur
Kolhapursaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडी रेल्वे स्थानकावर ग्रामस्थांसह प्रवाशांनी आंदोलन केले. आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांनी रूकडी ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वे ट्रॅकवरून पदयात्रा काढत हे आंदोलन केले. दरम्यान रेल्वे पाेलीसांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन आंदाेलन मागे घेण्याची विनंती केली परंतु ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर पाेलीसांनी रेल्वे ट्रॅकवरील आंदोलकांना ताब्यात घेतले. (Maharashtra News)

Kolhapur
Beed News : ऊसतोडणीच्या वाढीव दरासाठी बीडला आंदाेलन, मजूर कामगार संघटनेचा आक्रमक पवित्रा

सांगली-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क लोहमार्गावरूनच पदयात्रा काढण्याचा निर्धार केला. आज रुकडी ते कोल्हापूरदरम्यान शेकडो रेल्वे प्रवासी रुळावरून कोल्हापूरला चालत जाण्यासाठी निघाले. या आंदोलनात रुकडी व गांधीनगरचे ग्रामस्थ, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधींचा देखील समावेश हाेता. रुळावरून कोल्हापूरला जात असताना आंदाेलक आत्मक्लेष देखील करणार असल्याचे सांगण्यात आले.

Kolhapur
Navratri 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, माहुरसाठी यवतमाळहून साेडल्या जाणार विशेष बस

अशा आहेत ग्रामस्थांची मागण्या

१.रुकडी आणि गांधीनगर स्थानकांवर सर्व पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या थांबाव्यात.

२. सांगली ते कोल्हापूरदरम्यान अतिरिक्त पॅसेंजर गाड्या सोडाव्यात.

३. प्रवासासाठी तिकिटाचे दर कमी करा.

४. रुकडी भुयारी मार्ग व रुकडी-इचलकरंजी उड्डाण पुलाच्या समस्या सोडवा.

५.रुकडी स्थानकातील जुने तिकीटघर विकसित करा.

दरम्यान, सांगली, मिरज ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या मनमानी निर्णयांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. कोरोनापूर्वीच्या काही पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू न केल्याने प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. पॅसेंजरचे तिकीट शुल्क दुप्पटीने वाढविण्यात आले आहे.

आंदाेलकांशी रेल्वे पाेलीसांची चर्चा

सांगली-कोल्हापूरदरम्यानचे काही थांबे रद्द केले आहेत. याविरोधात प्रवासी संघटनांनी वारंवार आंदोलने केली आहेत. पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकांतही सातत्याने आवाज उठविण्यात आला आहे, तरीही रेल्वे प्रशासन प्रवाशांचे हाल कमी करण्याच्या मानसिकतेत नाही. याच्या निषेधार्थ रुळावरून पदयात्रा काढण्याचा इशारा देण्यात आला हाेता. दरम्यान आंदाेलकांना रेल्वे पाेलीसांनी ताब्यात घेत त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा सुरु केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Kolhapur
Talegoan : देवेंद्र फडणवीस, सुरेश खाडे दुतोंडी साप, जनरल मोटर्सच्या कामगारांचा सत्ताधा-यांना शाप लागेल : विजय वडेट्टीवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com