2 Ganpati Special Train Saam Tv
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकणातून परत येण्याचे टेन्शन घेऊ नका, २ स्पेशल ट्रेन धावणार; वेळापत्रक आणि थांबा, जाणून घ्या सर्वकाही

2 Ganpati Special Train : कोकणातून परत येणाऱ्या गणेशभक्तांचे टेन्शन दूर झाले आहे. त्यांच्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन २ विशेष ट्रेन सोडणार आहेत.

Priya More

गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात गेलेत. या गणेशभक्तांसाठी रेल्वे प्रशासन, एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. कोकणामध्ये गेलेले गणेशभक्त गणेश विसर्जन झाल्यानंतर पुन्हा मुंबईकडे येणार आहेत. अशामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मडगाव ते पनवेलदरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे कोकणातून परतणाऱ्या चाकारमान्यांना दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये गेलेल्या गणेशभक्तांना परत येण्यासाठी कोणत्या गाडीने यावे याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. कोकणातून परत येताना देखील त्यांचा प्रवास सोपा आणि सुखकारक व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने गणपती उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल आणि मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार आहेत.

कोकणातून येण्यासाठी विशेष ट्रेन -

- ०१४२८ विशेष ट्रेन - १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून ९.३० वाजता सुटेल. ही ट्रेन पनवेल येथे त्याच दिवशी रात्री १०.१५ वाजता पोहचेल.

- ०१४२७ विशेष ट्रेन - १५ सप्टेंबर रोजी पनवेल येथून ११.४५ वाजता सुटेल. ही ट्रेन मडगाव येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता पोहचेल.

विशेष ट्रेनचा थांबा कुठे?

या विशेष ट्रेन पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या सर्व स्थानकांवर थांबेल.

अशी असेल ट्रेन -

या विशेष ट्रेनमध्ये एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलिकत, २ तृतीय इकॉनॉमी, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर कार डबे असतील. तर सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आनारक्षित डबे म्हणून चालवले जातील.

असे करा तिकीट बुक -

या विशेष ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी तु्म्ही युटीएसचा देखील वापर करू शकता. मेल आणि एक्स्प्रेससाठी लागू असलेल्या अनारक्षित सामान्य शुल्कासह या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT