Ganeshotsav Special Trains: बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात जायला विशेष ट्रेन, पाहा वेळापत्रक

konkan Ganpati Special Train 2024 : कोकणात जाणाऱ्यांसाठी आता स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मुंबई ते कुडाळ यादरम्यान ही ट्रेन धावणार आहे.
 konkan Ganpati Special Train 2024
konkan Ganpati Special Train 2024Saam TV
Published On

Ganpati trains in Konkan : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आलाय. पण ट्रेन्स अन् बसेस फुल्ल असल्यामुळे कोकणकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात एसटी बसेसचा संप असल्यामुळे अडचणीत आणखी वाढ झाली. पण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन अनारक्षित असणार आहे. मुंबई सीएसएमटी ते कुडाळ (०११०३) ही स्पेशल अनारक्षित गाडी सुरु करण्यात आली आहे.

लाडक्या गणपती बप्पाचे आगमानासाठी सर्वजण आतुर आहेत. अवघ्या तीन दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून कोकण रेल्वेनं अनारक्षित विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते कुडाळ यादरम्यान धावणार आहेत.

गणपती बाप्पांच्या आगमानासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यात कोकणात जाण्याऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे स्पेशल ट्रेन सुरु कऱण्याचा निर्णय घेण्यात आला. चार आणि सहा सप्टेंबर रोजी मुंबईहून गाडी निघेल तर पाच आणि नऊ सप्टेंबर रोजी कुडाळवरुन माघारी गाडी परतणार आहे.

 konkan Ganpati Special Train 2024
Ganeshotsav Trending Songs : बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला; रिल्स बनवण्यासाठी गणेशोत्सव स्पेशल भन्नाट गाणी

गाड्या कधी सुटणार ?

अतिरिक्त गर्दी पाहून कोकण रेल्वेने कोकणात जाण्यासाठी मुंबई सीएसएमटी - कुडाळ अशी स्पेशल अनारक्षित ट्रेन सुरु कऱण्यात आली.

४ आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ही गाडी सीएसएमटी स्थानकातून कुडाळकडे रवाना होईल.

५ आणि ९ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता कुडाळ स्थानकातून मुंबईकडे रवाना होईल.

कुठे कुठ थांबणार ?

दादर, ठाणे, पनवेल, पणे, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, काणठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी या गाडाला थांबा असेल.

 konkan Ganpati Special Train 2024
Bandra- Madgaon Express : कोकणात जायला आणखी एक ट्रेन, थांबा कुठे? तिकीट किती? जाणून घ्या वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com