bachchu Kadu, sachin tendulkar, ganeshotsav 2023  Saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 : 'गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार'

सरकराने शेती मालास रास्त भाव द्यावा अशी मागणी देखील एका प्रश्नावर बाेलताना बच्चू कडू यांनी केली.

विश्वभूषण लिमये

Bacchu Kadu News : गणपती मंडळापुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकर यांना पाठवणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी साेलापूर दाै-यावर असताना नमूद केले. जंगली रमीची जाहिरात करणा-या महान खेळाडूस हे पैसे त्यांच्या घरी पाेहचविले जातील असेही कडू यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

सचिन तेंडुलकर यांनी जंगली रमीची जाहिरात केल्याच्या विरोधात सोलापुरातील अकोलेकाटी गावातील गणपती मंडळपुढे चक्क भीकपेटी ठेवण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी या मंडळाला भेट देत गणरायाची पूजा केली. त्यानंतर या पेटीत स्वतः 100 रुपये टाकत सचिन तेंडुलकर यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या विचारांचे जितके गणेश मंडळ आहेत तिथे अशा भीक पेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे विसर्जन झाल्यानंतर तेंडुलकर यांच्या घरी पोहचवू असा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावात मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत गणपती मंडळाची स्थापना केली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या यार मंडळातील गणरायाची पूजा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडली.

राज्यात एकीकडे दंगलीचे वातावरण झाले, मात्र अशात अकोलेकाटी या गावातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन गणपती मंडळाची स्थापना केली हे अतिशय धाडसाचे आणि कौतुकाचे काम आहे. मी या कार्याला सलाम करतो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिली.

दरम्यान आमच्या गावाची लोकसंख्या ही पाच हजार आहे. मात्र आम्ही सर्व गुण्या गोविंदाने राहत आलोय. यंदा पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव मुस्लिम युवा गणेश मंडळाच्या माध्यमातून करतोय याचा आम्हाला आनंद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT