ganesh visarjan  Saam tv
महाराष्ट्र

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

ganesh visarjan 2025 News : गणपतीचे विसर्जन करताना शहापुरात तीन तरुण वाहून गेले आहेत. तर पुण्यातील खेडमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

शहापूरमध्ये विसर्जनादरम्यान ३ तरुण नदीत वाहून

पुण्यात वाकी बुद्रूक येथे दोन युवकांचा बुडून मृत्यू

अकोल्यात गणपती विसर्जनावरून परतताना अपघात

प्रशासनाकडून शोधकार्य आणि तपास सुरू

शहापूर : राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत आहे. भक्तांकडून गणपती बाप्पाचा जयघोष करत गणेश मूर्तींचं विसर्जन नदी, समुद्र, तलावात केलं जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे जिल्हा गणेशभक्तांनी दुमदुमून गेला आहे. गणेश मूर्तीचं विसर्जन करताना शहापुरात तीन तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शहापुरात गणपतीचं विसर्जन करत असताना तीन तरूण वाहून गेल्याची घटना आहे. शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील मुंडेवाडी येथील दहा दिवसांचे गणपती हे भारंगी नदीत विसर्जन करत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात तीन तरूण वाहून गेल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि जीवरक्षक पथकाचे सदस्य घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेनंतर तीन तरुणांचा शोध घेतला जात आहे.

पुण्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रूकजवळ गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. vv

अकोल्यात गणेश विसर्जनानंतर परताना एकाचा अपघाती मृत्यू

अकोल्यात गणेश विसर्जन करून परतताना गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला. अकोल्यातल्या पातूर-अकोला रस्त्यावर अपघाताची घटना घडली आहे. अपघातात एका तरुणाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्व जण अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच कापशी तलावावरून गणेश विसर्जन करून परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. मृत आणि जखमी असे चौघे जण एकाच दुचाकीवर जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने जबर धडक दिली. अकोल्यातील हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात अक्षरशः दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तर कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. रामचरण अंधारे असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राहुल खोंड, विनोद डांगे, विकी माळी हे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT