Ulhasnagar News : धक्कादायक! उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुलींचं पलायन

Ulhasnagar News update : उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुलींचं पलायन केलं आहे.
Ulhasnagar News update
Ulhasnagar NewsSaam tv
Published On
Summary

उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर

सुरक्षारक्षकांच्या अनुपस्थितीत मुख्य दरवाजाची चावी घेऊन मुलींनी पलायन

४ मुली सापडल्या असून २ अजूनही बेपत्ता

अजय दुधाणे, साम टीव्ही

उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पलायननंतर पोलिसांनी चार मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोन मुलींचा शोध सुरु आहे.

Ulhasnagar News update
Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

उल्हासनगरमधील महिला आणि बाल सुधारगृहातून काही महिन्यांपूर्वीही या सुधारगृहातून आठ मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पलायन केले होतं. त्यामुळे सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पलायन केलेल्या मुलींनी परत आल्यानंतर पोलिसांना जबाब दिला होता. 'आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून आम्ही आपल्या घरी निघालो' असे सांगितलं. मात्र यामागे केवळ घराची ओढ नसून सुधारगृहातील अनेक गैरसोयीही उघड झाल्या आहेत.

Ulhasnagar News update
Chhagan Bhujbal : मराठा समाजामुळे आमच्या ताटातील भाकर जाणारच; सरकारच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? VIDEO

उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी माहिती देताना सांगितलं की, दुपारच्या वेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी गेले असताना मुलींनी मुख्य प्रवेशद्वाराची चावी घेऊन पलायन केलं. सुधारगृहातील अल्पवयीन मुलींच्या सलग पलायनाच्या घटनांमुळे सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. प्रशासन आणि महिला बालविकास विभागाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पलायनाच्या या संपूर्ण कारवाईची माहिती परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित मुलींचा कसून शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवलेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com