Vandalized Shiv Sena (UBT) party office in Gadchiroli after a senior leader was removed from the district chief post. Saam tv
महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गोंधळ; पदावरून उचलबांगडी केल्याने ऑफिस फोडलं, AC, पंखे, खुर्च्यां घरी नेल्या

Thackeray Faction Leader Vandalizes Gadchiroli Office: गडचिरोलीत शिवसेना (ठाकरे गट) मध्ये मोठा वाद उफाळला असून जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर नेत्याने पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.

Omkar Sonawane

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

गडचिरोलीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि गटबाजी आता थेट रस्त्यावर आणि पक्ष कार्यालयात आली आहे. पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याने नाराज झालेल्या माजी जिल्हाप्रमुखांनी चक्क पक्ष कार्यालयाचीच तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयातील टेबल, खुर्च्या, पंखे, एसी (AC) आणि अगदी विजेचे बल्बसुद्धा माजी जिल्हाप्रमुखांनी काढून नेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नव्या नियुक्त्यांमुळे वाद पेटला

शिवसेना (उबाठा) पक्षाकडून नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये संघटनात्मक बदल करताना गडचिरोली आणि आरमोरी विधानसभेसाठी पवन गेडाम तर अहेरी विधानसभेसाठी दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, नव्या नियुक्त्या जाहीर होताच जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून आला.

माजी जिल्हाप्रमुखांचा हायव्होल्टेज ड्रामा

यापूर्वी जिल्हाप्रमुख पदाची धुरा सांभाळणारे वासुदेव शेडमाके यांना या नव्या नियुक्तीत डावलण्यात आले. पक्षाच्या या निर्णयामुळे शेडमाके प्रचंड नाराज झाले. या नाराजीतून आणि रागातून त्यांनी थेट पक्ष कार्यालय गाठले. कार्यालयातील पीओपी (POP) तोडण्यात आली, तसेच स्वतःच्या कार्यकाळात लावलेले टेबल, खुर्च्या, पंखे, एसी आणि बल्ब असे सर्व साहित्य त्यांनी तिथून काढून नेले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नेतृत्व बदल करण्यात आले असले तरी या घटनेमुळे शिवसेना उबाठा गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पक्ष कार्यालयातच झालेल्या या तोडफोडीमुळे आणि साहित्य पळवून नेण्याच्या प्रकारामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर थेट पक्ष शिस्तीला आव्हान देणाऱ्या या प्रकाराची मुंबईतही गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. पक्ष कार्यालयाचे नुकसान करणाऱ्या आणि पक्षाची नाचक्की करणाऱ्या माजी जिल्हाप्रमुखांवर शिवसेना (उबाठा) पक्ष नेतृत्व आता काय कारवाई करणार आणि या वादामुळे डॅमेज झालेल्या पक्षाची प्रतिमा नवे जिल्हाप्रमुख कशी सावरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'नागरिक सरकारचे गुलाम आहेत का?' 'पोलीस पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे नव्हे जनतेचे सेवक'

'राम मंदिर पैशांचा वापर पक्षफोडीसाठी', उद्धव ठाकरेंचा भाजपवर मोठा आरोप, ठाकरेंचा भाजपविरोधात रामरक्षा आंदोलन

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे, पोलिसांना सापडले पुरावे; सिया-चेतन करायचे कोड वर्डने चॅटिंग

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

SCROLL FOR NEXT