Maharashtra Pradesh Congress Committee : महाराष्ट्र क्राँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshwardhan Sapkal यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सपकाळ पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे. या अंतर्गत जिल्हा स्तरापर्यंत तब्बल ७००० नव्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या बदलांसाठी केवळ महाराष्ट्रासाठी विशेष परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कुणाची खुर्ची जाणार अन् कुणाला संधी मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.
राज्यातील निवडणुकीला अद्याप मोठा कालावधी आहे. पण त्याआधीच काँग्रेसकडून आपली तयारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरापासूनच काँग्रेसमध्ये बदल केले जाणार आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.