Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज कोसळून महिलेचा मृत्यू, एकजण गंभीर; गडचिरोली जिल्ह्यातील घटना, नागपुरातही मुसळधार पाऊस

Gadchiroli News : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारच्या सुमारास अचानक गडचिरोलीच्या सावली तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली

संजय तुमराम

गडचिरोली : मागील पाच- सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज गडचिरोली व नागपूरमध्ये जोरदार हजेरी लावली. या दरम्यान वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील सावली तालुक्यातील केरोडा गावात घडली. 

चित्रकला सुधाकर भुरसे असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारच्या सुमारास अचानक (Gadchiroli) गडचिरोलीच्या सावली तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. सकाळी उघडीप असल्याने शेतीच्या कामासाठी अनेकजण शेतात गेले होते. या दरम्यान शेतात काम करीत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज (Lightning Strike) कोसळली. त्यात चित्रकला भुरसे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला एकजण जखमी आहे. जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नागपुरच्या काही भागात जोरदार सरी
नागपूर
: मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. यानंतर कडक ऊन पडत होते. मात्र आज अचानक दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. (Nagpur) नागपूर शहरातील अनके भागात विजांचा कडकडाटसह पावसाचे आगमन झाले. ढगाळ वातावरण झाल्याने काळोख पसरल्याने दिवसा लाईट लावण्याची वेळ वाहन चालकांवर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शिवा शर्मा हत्याकांडातील आरोपी श्रद्धा दुबेसह तिघांना न्यायालयात हजर करणार

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT