TMC MLA Paresh Ram Das arrested at Kolkata airport : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आणखी एक आमदार गंभीर फौजदारी आरोपांखाली कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अडकलेला तृणमूल काँग्रेस (TMC) आमदार आमदार परेश राम दास यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते मुंबईला पळून जाण्यासाठी कोलकाता विमानतळावर पोहोचले होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग वेस्ट मतदारसंघाचे टीएमसी आमदार परेश राम दास यांच्यावर बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा आहे. सोमवारी कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आमदार परेश राम दास हे बलात्कार, खंडणी आणि गुन्हेगारी कट यांसारख्या अनेक गंभीर प्रकरणांमध्ये बऱ्याच काळापासून फरार होते. सोमवारी इंडिगोच्या विमानाने मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.
फरार असलेले आमदार परेश राम दास मुंबईला जाणाऱ्या विमानासाठी विमानतळावर पोहोचत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एसओजीच्या पथकाने आमदारांच्या ठिकाणाचा माग काढला आणि तात्काळ बिधाननगर पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला. विमानतळ सुरक्षा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून, विमानात चढण्यापूर्वीच आमदारांना ताब्यात घेण्यात आले.
परेश दास यांना अटक केल्यानंतर बारुईपूर जिल्हा पोलीस मुख्यालयात नेले. त्यानंतर कसून चौकशी सुरू आहे. आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कॅनिंग पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२६ रोजी नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक ५६१/२०२६ मध्ये आमदार परेश राम दास हे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम 376 (बलात्कार), 323 (इच्छेने दुखापत करणे), 420 (फसवणूक), 120B (गुन्हेगारी कट) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि खंडणी व्यतिरिक्त, त्याच्यावर २०२३ च्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेला हिंसाचार, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
सप्टेंबरच्या सुरुवातीला पंचायत निवडणुकीतील हिंसाचार प्रकरणात सीआयडीने त्यांची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आणि गेल्या १७ दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेल्या टीएमसी आमदाराच्या हाय-प्रोफाईल अटकेमुळे बंगालच्या राजकारणात भूकंप झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.