Ration Shop : रेशन धान्य वाटपात सर्व्हर डाऊनची अडचण कायम; दोन महिन्यांपासून ई पॉस मशीन चालेना

Nagpur News : रेशन वाटप करण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदाराला धान्य वाटप करण्याच्या नोंदी ठेवण्यासाठी लाभार्थींचे बोटाचे ठसे घेण्यासाठी ई पॉस मशीन देण्यात आले आहे
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर  

नागपूर : नागपूरात रेशन धान्य दुकानात अजूनही धान्य वाटपात सर्व्हरच्या अडचणी कायम आहेत. मागील महिन्यापासून रेशन ई पॉस मशीन व्यवस्थित चालत नसल्याची अडचण या महिन्यात देखील कायम आहे. यामुळे रेशन दुकानदाराकडून आता अनेकांना ऑफलाईन धान्य वाटप करावे लागत आहे.

Nagpur News
Bhandara News : तरुणाने तयार केले इमर्जेंसी मोबाईल ॲप; अपघात होताच कुटुंबियांना मिळणार तात्काळ माहिती

रेशन वाटप करण्यासाठी प्रत्येक (Ration Shop) रेशन दुकानदाराला धान्य वाटप करण्याच्या नोंदी ठेवण्यासाठी लाभार्थींचे बोटाचे ठसे घेण्यासाठी ई पॉस मशीन देण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून रेशन दुकानदारांसमोर सर्व्हर डाऊनची समस्या कायम आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे घेता येत नाही. दरम्यान ऑफलाईन धान्य वाटप करायची मुभा असली, तरी त्यासाठी ऑफलाइन धान्य वाटप केल्याची नोंद (Nagpur) करायची असलेली वेबसाईटवर सुद्धा काम करत नसल्याचे रेशन धान्य दुकानदार सांगत आहेत. 

Nagpur News
Malkapur News : वस्तीत असलेले बिअर बार हटवण्यासाठी महिलांचे दुकानासमोर बेमुदत उपोषण

दिवसभरात शंभर ते दीडशे ग्राहकांना रेशन दिलं जाऊ शकत. पण ई पॉस मशीन व्यवस्थित काम करत नसल्यानं दिवसभरात केवळ ३० ते ४० जणांना रेशन धान्य वाटप करू शकत असल्याचा दावा रेशन धान्य दुकानदार करत आहे. दरम्यान ऑफलाईन धान्य वाटप करावे लागत असल्याने त्याची नोंद ठेवता येण्यास देखील अडचण आहे. त्यामुळे ऑफलाइन धान्य वाटप झालं, तरी मानधन मिळेल का नाही अशी शंका रेशन दुकानदारांना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com