संदीप भोसले
लातूर : गावात सर्रासपणे दारूची विक्री केली जात आहे. या विरोधात महिला रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. वारंवार तक्रार करून देखील दारू विक्री बंद होत नसल्याने महिलांनी अनोख आंदोलन छेडले आहे. यात घरातील संतप्त महिलांनीच ग्रामपंचायतीच्या समोर दारूचे दुकान थाटले आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातील वडवळ या गावात अवैध दारू सुरु आहे. गावात सर्रासपणे होत असलेली दारू विक्रीमुळे अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. तरुण मुले देखील दारूच्या नशेत असतात. हा सर्व प्रकार लक्षात घेता गावातील दारू विक्री थांबविण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली होती. (Liquor Ban) मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता दुर्लक्ष केले जात होते. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत दारू विक्री विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दुकान मांडत केला निषेध
दारूची विक्री थांबवा या मागणीसाठी गावातील महिलांनीच (Gram Panchayat) ग्रामपंचायत समोर दारूचे दुकान मांडत निषेध केला. अनेकदा मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचे महिलांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. ग्रामपंचायती समोर दारू दुकान मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा महिलांनी प्रयत्न केला. यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.