Suraj Chavan: 'माझी लाडाची लक्ष्मी...'; सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेक राधाचा चेहरा, VIDEO व्हायरल

Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाणने दिवाळीत पहिल्यांदाच लेक राधाचा चेहरा दाखवला. पत्नी संजना आणि मुलीचे पाय धुवून केलेल्या लक्ष्मीपूजनाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Suraj Chavan
Suraj ChavanSaam Tv
Published On: 

मुंबई : 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता आणि 'गुलिगत' फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सूरजने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. त्याने पहिल्यांदाच आपल्या चिमुकल्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. पत्नी संजना आणि लाडक्या लेकीसोबत सूरजने लक्ष्मीपूजन केलं. या खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चिमुकल्या राधाच्या गोंडस रूपावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सूरज चव्हाणने दाखवली लेक राधाची पहिली झलक

सूरज चव्हाणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष्मीपूजनाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरजच्या मांडीवर त्याची चिमुकली लेक राधा दिसत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओच्या माध्यमातून सूरजने पहिल्यांदाच मुलीचा चेहरा समोर आणला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते सूरजच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर दिवाळीच्या निमित्ताने त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. सूरजने या व्हिडीओला 'माझी लाडूबाई, माझी लाडाची लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन' असं कॅप्शन दिलं आहे.

Suraj Chavan
Sunil Grover: एका चित्रपटासाठी घेतो लाखोंचं मानधन, तरीही 'हा' अभिनेता रस्त्यावर विकतोय फुलं-कंदील; नेमकं कारण काय?

लेकीसह पत्नीचेही पाय धुवून केलं पूजन

सूरजने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये लक्ष्मीपूजनाच करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्याची पत्नी संजना पाटावर बसलेली दिसते. तिच्या मांडीवर त्यांची चिमुकली राधा आहे. यावेळी सूरज सर्वप्रथम आपल्या लेकीचे पाय पाण्याने धुतो. त्यानंतर तिच्या पायांना हळद-कुंकू लावतो आणि फुलं वाहून पूजा करतो. लेकीचं औक्षण करत तो तिच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करतो. यानंतर सूरज पत्नी संजनाचेही पाय धुतो. तिच्या पायांना हळद-कुंकू लावून फुलं वाहतो आणि औक्षण करतो. विशेष म्हणजे, सूरज पत्नीच्या पाया पडून तिचे आशीर्वादही घेतो. सूरजचा हा प्रेमळ अंदाज पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

Suraj Chavan
Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम आल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

जान्हवी किल्लेकरची खास कमेंट

सूरजच्या या व्हिडीओवर अभिनेत्री आणि त्याची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. 'आमची लक्ष्मी' अशी कमेंट करत तिने चिमुकल्या राधावर प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनीही सूरज आणि संजनाचं कौतुक करत त्यांच्या लेकीला भरभरून आशीर्वाद दिले आहेत.

जन्माष्टमीमुळे लेकीचं नाव ठेवलं राधा

सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर 2025 रोजी संजनासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 4 सप्टेंबर 2026 रोजी त्यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं. जन्माष्टमीच्या दिवशी मुलगी झाल्यामुळे सूरजने तिचं नाव 'राधा' ठेवलं. आता दिवाळीच्या निमित्ताने सूरजने लेकीचा चेहरा दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.