योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात ही अपघाताची घटना घडली. माजी आमदार आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते. आर टी देशमुख यांच्या अपघाती मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख उर्फ जिजा यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यात आर टी देशमुख यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. आर टी देशमुख यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
लातूरमध्ये आर टी देशमुख अपघातात जखमी झाले. अपघातात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आर टी देशमुख यांचा लातूरमधील औसा रोडवर अपघात झाला.
आर टी देशमुख हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. माजलगावमधून ते आमदार झाले. त्यांनी भाजपच्या संघटनात्मक मांडणीसाठी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात आणि भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. आर टी देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी आमदार आर टी देशमुख यांचा कारला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला. या अपघातात आर टी देशमुख गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आर टी देशमुख यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे तत्काळ आपले कार्यक्रम रद्दे केले आहे. त्या लातूरला रवाना झाल्या आहेत.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं की, 'लातूरच्या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांचे दु:खद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.