Dhule BJP : महावितरणच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक; घेराव घालत अधिकाऱ्यास काळे फासण्याचा प्रयत्न

Dhule News : धुळ्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात भाजपकडून करण्यात आलेले आंदोलन धुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भाजप नेत्या कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे
Dhule BJP
Dhule BJPSaam tv
Published On

धुळे : महावितरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरिकांकडून कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने धुळे शहरातील साक्री रोडवरील मुख्य महावितरण कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान महावितरणच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धुळ्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात भाजपकडून करण्यात आलेले आंदोलन धुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भाजप नेत्या कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येत असताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच नागरिकांचे काही काम असल्यास महावितरणचे कर्मचारी पैसे घेतल्याशिवार काम करत नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 

Dhule BJP
Nandurbar : मजुरी करून परत येताना वाटेतच प्रसूती वेदना; बसस्थानकातच महिलेची प्रसूती

अधिकाऱ्यांना घातला घेराव 

दरम्यान भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच यावेळी त्यांच्यावर थेट आरोप करत याबाबत जाब विचारला. यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. नागरिकांच्या तक्रारी असूनही महावितरण विभाग दुर्लक्ष करत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Dhule BJP
Panchganga River Flood : मान्सूनपूर्व पावसात पंचगंगा नदीला पूर; राजाराम बंधाऱ्यावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद

अधिकाऱ्याला काळे फासण्याचा प्रयत्न 

भाजप नेत्या कल्याणी अंपळकर यांनी आंदोलन करताना महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर शाही फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करत हा अनुचित प्रकार टाळला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र त्यामुळे महावितरण कार्यालयात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com