Jalgaon Train Google
महाराष्ट्र

Jalgaon News: धावत्या ट्रेनला आग, धूर पाहून प्रवासी घाबरले; जीव मुठीत धरून पळापळ, नेमकं काय घडलं?

Jalgaon Train Fire: जळगावमध्ये धावत्या अमृतसर एक्स्प्रेसला अचानक आग लागली. धूर येत असल्याचे पाहून प्रवासी प्रचंड घाबरले. जीव वाचवण्यासाठी प्रवासी पळू लागले.

Priya More
  • जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनला आग लागली

  • अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग लागली

  • धुराचे लोट बाहेर पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली

  • रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली

संजय महाजन, जळगाव

मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या ११०५७ अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेक डिस्कला आग लागल्याची घटना बुधवार सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. जळगाव रेल्वे स्थानकावर ही ट्रेन आली असता हा प्रकार समोर आला. ट्रेनमधून धूर येत असल्याचे पाहून प्रवासी प्रचंड घाबरले आणि ते पळू लागले. रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग तात्काळ आटोक्यात आली असून संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अमृतसरकडे धावणारी अमृतसर एक्स्प्रेस सकाळी ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी रेल्वे रुळाला लागलेली एक चावी उडून डीव्हीला लागल्याने एअर प्रेशर अचानक रिलीज झाले. परिणामी सामान ब्रेक आणि जनरेटर कार बोगीचे ब्रेक अचानक दाबले गेले. या प्रक्रियेमुळे ब्रेक डिस्कमध्ये तीव्र घर्षण निर्माण होऊन आग लागली.

आगीनंतर बोगीच्या ठिकाणावरून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागल्याने स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्येही घबराट पसरली. मात्र रेल्वे स्थानकावरील तसेच रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जनरेटर बोगीतील दोन फायर एक्स्टिंग्विशरच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, भुसावळ येथील ड्युटी आटोपून इगतपुरी मेमूने घरी जात असलेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव जळगाव स्थानकावर उतरले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी एअर प्रेशर नियंत्रित केले आणि रेल्वेची यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी सुमारे ८.१५ वाजता अमृतसर एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा प्रवाशांना दुखापत झाली नसली, तरी रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live Update : शिंदेंना 'मुख्य नेता' पद दिलं कुणी?, कपिल सिब्बल यांच्या एकाच प्रश्नाने सुप्रीम कोर्टात खळबळ

Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना

मुलांच्या क्रिएटिव्हिटीला द्या पंख, १५ ऑगस्टनिमित्त घरी आणि शाळेत बनवा सुंदर 5 क्राफ्ट

Viral Video : सोसायटीत रात्री पावणेदोनला थरार, भरधाव कारने गेटला दिली जोरदार धडक; दैव बलवत्तर म्हणून वॉचमन थोडक्यात बचावला

पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT