१५५ ग्रॅम MD, दोन आयफोन आणि दोन आरोपी; मुंबई पोलिसांनी उधळला डाव

Andheri Hotel MD Drug Seizure News: मुंबईतील अंधेरी पश्चिमेच्या नामांकित हॉटेलमध्ये वर्सोवा पोलिसांनी छापा टाकून १५५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. ७.७५ लाख रुपये किमतीच्या एमडी ड्रग्जसह दोन आयफोन हस्तगत करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Andheri West Astros Hotel MD drug seizure news
Andheri West Astros Hotel MD drug seizure newssaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंधेरी पश्चिमेतील एस.व्ही.पी. नगर म्हाडा परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना वर्सोवा पोलिसांच्या एटीसी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १५५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले असून, त्याची बाजारातील अंदाजे किंमत ७ लाख ७५ हजार रुपये आहे. याशिवाय दोन आयफोनही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Andheri West Astros Hotel MD drug seizure news
Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे आणि एटीसी पथक दैनंदिन कर्तव्य बजावत होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाकडून रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि लॉजची तपासणी सुरू होती. याचदरम्यान पथकातील पोलीस हवालदार खोंडगे यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर हॉटेलच्या रूम क्रमांक १०४ मध्ये दोन व्यक्ती एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.

Andheri West Astros Hotel MD drug seizure news
दिवाळीची साफसफाई पडली महागात! ॲपवरून बोलावलेल्या कामगारांनी सोने-चांदीवर मारला डल्ला, मुंबईत नेमकं काय झालं?

ही माहिती पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्सोवा विभाग यांना माहिती दिली. माहितीची खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर एटीसी पथकाने रात्री सुमारे १.३० वाजता संबंधित हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी रूम क्रमांक १०४ मध्ये दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आढळून आला. हा पदार्थ विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या कारवाईत १५५ ग्रॅम मेफेड्रॉन, अंदाजे किंमत ७ लाख ७५ हजार रुपये, तसेच दोन आयफोन जप्त करण्यात आले.

Andheri West Astros Hotel MD drug seizure news
Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सध्या दोन्ही आरोपी वर्षा पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींनी एमडी अमली पदार्थ कुठून आणले आणि ते कुणाला विकणार होते या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्राजक्ता पवार आणि रात्रपाळी पोलीस निरीक्षक अमर डेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Andheri West Astros Hotel MD drug seizure news
Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

एटीसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार खोंडगे, पोलीस शिपाई खैरनार आणि पोलीस शिपाई ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.