Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

youth Dies After Suspected Narcotics Overdose: मुंबईच्या मालाडमध्ये भयंकर घटना घडली. ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर गंभीर आरोप केले.
Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू
Mumbai Crime News Saam Tv
Published On: 
  • मुंबईच्या मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तरुणाचा मृत्यू

  • २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जमुळे मृत्यू

  • अप्पापाडा बीएमसी गार्डनमध्ये घडली घटना

  • तरुणाला मित्रांनी ड्रग्जचे अनेक इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

  • कुरार पोलिसांकडून अमन सोनी मृत्यू प्रकरणाचा तपास

संजय गडदे, मुंबई

मुंबईच्या मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजक घटना घडली. कुरार व्हिलेज परिसरात २० वर्षीय अमन सोनी या तरुणाचा मृत्यू झाला. अमनला त्याच्या काही मित्रांनी घरातून बोलावून अप्पापाडा येथील बीएमसी गार्डनमध्ये नेले आणि तेथे त्याला ड्रग्जचे अनेक इंजेक्शन दिल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अमनच्या चार मित्रांना ताब्यात घेतले.

अमनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अमनला क्रांतीनगर परिसरात राहणारे काही मित्र घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर त्याला अप्पापाडा येथील बीएमसी गार्डनमध्ये नेण्यात आले. तेथे अमनला ड्रग्जचे अनेक इंजेक्शन देण्यात आले. अमनची प्रकृती बिघडल्यानंतरही त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी त्याला वेळीच वैद्यकीय मदत दिली नाही. जर त्याला वेळीच रुग्णालयात नेले असते तर त्याचे प्राण वाचले असते.

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू
Mumbai Crime : अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला, अन् पैशांसाठी चोर झाला; सीसीटीव्हीने बिंग फुटले

या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अमन नशेच्या अवस्थेत तडफडताना आणि त्याच्या आसपास काही तरुण असल्याचे दिसत आहे. मात्र, या व्हिडिओतील नेमके तथ्य आणि त्याची सत्यता पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अमन यापूर्वी ड्रग्जच्या आहारी गेला होता. मात्र, मित्रांसोबत झालेल्या वादानंतर त्याने काही काळ नशा सोडली होती.

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू
Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

काही महिन्यांनंतर त्याचे मित्र पुन्हा त्याला सोबत घेऊन गेल्याचा आणि त्यानंतर ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी त्याच्याच मित्रांनी त्याला ड्रग्जचे इंजेक्शन दिले. अमनची प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले अन्य तरुणही नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी अमनच्या मित्रांना ताब्यात घेतलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर अमनच्या मृत्यूमागचे नेमके कारण समोर येईल.

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू
Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

दरम्यान, अप्पापाडा येथील बीएमसी गार्डनमध्ये फॉरेन्सिक पथकाने तपास केला. घटनास्थळावर नशेशी संबंधित काही साहित्य तसेच रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांकडून या साहित्याची तपासणी केली जात आहे. अमनला गार्डनमध्ये नेमके कोण घेऊन गेले?, त्याला कोणत्या प्रकारचे ड्रग्ज देण्यात आले?, इंजेक्शन कोणी दिले आणि त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात का नेण्यात आले नाही? याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच गार्डन परिसरात यापूर्वीपासून ड्रग्जचा वापर सुरू होता का? याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू
Mumbai Crime: बांधकाम व्यावसायिकाला धमकी, खंडणी घेताना तिघांना रंगेहात पकडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com