मुंबईत दारू पार्टीत चेष्टा केल्याच्या रागातून मित्राची हत्या
कांदिवलीत झोपलेल्या मित्रावर चाकूने हल्ला
गोकुळनगरमध्ये दारू पार्टीच्या वादातून घडली घटना
२३ वर्षीय तरुणाला अटक
दारू पिताना मित्राने केलेल्या चेष्टा-मस्करीचा राग मनात धरून त्याच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली पूर्वेतील गोकुळनगर परिसरात घडली. झोपलेल्या मित्राच्या छातीवर चाकूने वार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात श्रीकांत जाधव याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी २३ वर्षीय विष्णू विश्वकर्मा याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता गोकुळनगर परिसरातील मॉडर्न डेअरीच्या मागे घडली. श्रीकांत जाधव हा त्याचा मित्र विष्णू विश्वकर्मा आणि सुनील ऊर्फ पान्सो यांच्यासोबत दारू पीत होता. यावेळी श्रीकांतने विष्णूची चेष्टा केल्याने दोघांमध्ये वाद झाला.
या वादानंतर विष्णूने श्रीकांतविषयी मनात राग धरल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. काही वेळाने श्रीकांत झोपल्यानंतर विष्णूने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. चाकूचा वार श्रीकांतच्या छातीच्या डाव्या बाजूला झाला. गंभीर जखमी झाल्याने श्रीकांतचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. श्रीकांतचा भाऊ साईनाथ दिलीप जाधव (३५) यांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 103(1) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 37(1)(a) आणि 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी विष्णू विश्वकर्माला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, या हत्येमागील नेमका घटनाक्रम, हल्ल्यात वापरलेले शस्त्र आणि इतर बाबींचा कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.