Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

Kalyan Police: कल्याणमध्ये बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाला धमकी दिली. महिन्याला १० हजार रुपये मागत मज्जू भाईने दहशत माजवली.
Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...
Kalyan Crime News Saam Tv
Published On
  • कल्याणमध्ये केबल व्यावसायिकाला धमकावले

  • पिस्तुलचा धाक दाखवत १० हजारांच्या हप्त्याची मागणी

  • माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर हप्ता द्या अशी दहशत

  • मज्जू भाईकडून केबल व्यावसायिकाला बंदुकीचा धाक

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पश्चिमेतील मुरारबाग परिसरात केबल व्यावसायिकाकडे दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत पिस्टल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी मजहर उर्फ ‘मज्जू’ फिरोज शेख या सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पहाटे केबल व्यावसायिक कार्तिक कोटक हे आपल्या सहकाऱ्यांसह मुरारबाग परिसरात उभे होते. त्यावेळी आरोपी मजहर उर्फ मज्जू शेख तेथे आला. माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाही तर कल्याणमध्ये धंदा करू देणार नाही,’ अशी धमकी देत त्याने खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...
Raigad Crime: रायगड हादरले! १७ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

कोटक यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने कंबरेला खोचलेले पिस्टल बाहेर काढून त्यांच्या छातीवर रोखल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तेजस गाळगे आणि केतन पवार यांनाही पिस्टल दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर कार्तिक कोटक यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत आरोपी मजहर उर्फ मज्जू शेख याला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

मजहर उर्फ मज्जू शेख हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत त्याच्यावर खंडणी, विनयभंग, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, मारहाण तसेच शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे यांसारखे १७ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई तसेच दोन वेळा तडीपारची कारवाईही करण्यात आली होती. सुमारे तीन महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...
Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com