पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात झांबरे कुटुंबावर गुन्हा दाखल
सासरच्या जाचाला कंटाळून पायल यांनी आत्महत्या केल्याची तक्रार
माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी लावला होता तगादा, पवार कुटुंबाचा आरोप
पायल पवार यांच्या सासू सासऱ्यांसह पती आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल
पायल यांचे बंधू ऋषिकेश पवार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दिली होती तक्रार
यावरून पायल यांचे पती अक्षय अरविंद झांबरे, सासू मंगल अरविंद झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि नणंद अक्षता झांबरे यांच्यावर गुन्हा दाखल
नाशिकच्या येवला तालुक्यातील शेवगे परिसरात बिबट्याचा धोका दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून, आता थेट कांदा चाळीत काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात तीव्र दहशत पसरली आहे.शेवगे परिसरातील गट नंबर ४१ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर सातत्याने सुरू आहे. येथील तरुण शेतकरी रोहित रतन झांबरे (वय २६) हे आपल्या शेतातील कांदा चाळीत नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घालून हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून झाली होती फसवणूक
महाराष्ट्र सायबरने केली
मेहुल सिमारिया, ४९ नावाच्या आरोपीला अटक
फसवणुकीतील १ कोटींची रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वळवण्यापूर्वी आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचं तपासात निष्पन्न
ऑक्टोबर महिन्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मधील ट्रेझरी खात्यातून 13.96 कोटी रुपयांची फसवणुकीने रक्कम वळवण्यात आल्याच प्रकरण
१५ आणि १७ ऑक्टोबरला RTGS व्यवहारात फेरफार करून देशभरातील विविध बँकांच्या लाभार्थी खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी अनधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला होता
बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेच्या सुरक्षित कम्युनिकेशन चॅनेलमधून RBI च्या पेमेंट प्रोसेसिंग सिस्टीमकडे पाठवण्यात येणाऱ्या RTGS व्यवहार प्रक्रियेत कथितरीत्या छेडछाड करण्यात आली
यामुळे १८७ अनधिकृत व्यवहारांद्वारे १३.९६ कोटी रुपयांची फसवणुकीने रक्कम डेबिट करण्यात आली
अवघ्या तीन दिवसांत ही रक्कम 36 वेगवेगळ्या बँकांमधील 107 लाभार्थी खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली.
याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाच्या मुंबई येथील नोडल सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 318(3), 318(4) आणि 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 43, 66 आणि 66(D) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे होत असलेल्या एमआयडीसीच्या विरोधात_ शेतकरी आज दुपारपासून चक्काजाम आंदोलन करीत असून आलापल्ली_चंद्रपूर व आलापल्ली- गडचिरोली असे दोन राष्ट्रीय महामार्ग बंद केलेले आहे_ वाहतूक ठप्प पडली असून_ कोणत्याही भूमिकेत आम्ही आमची सुपीक जमीन देणार नाही शेतकऱ्यांनी अशी भूमिका घेत चक्काजाम आंदोलन करीत आहे
कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर गेल्याने अशोक बाळासाहेब सानप (वय ३०) या शेतकरी मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे उळूप गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवायचा नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी घेतली आहे.या भूमिकेमुळे घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
▪️ लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचे ६ नोव्हेंबर रोजी वितरण.
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे दुपारी १२ वाजता होणार वितरण.
▪️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती.
▪️ पहिल्या टप्प्यातील तीन पुनर्वसन इमारतींमधील ५५७ सदनिकांच्या चाव्या पात्र रहिवाशांना दिल्या जाणार.
▪️ अनेक वर्षे १६० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता ५०० चौरस फुटांची प्रशस्त २ बीएचके सदनिका मिळणार.
▪️ पात्र रहिवाशांना या सदनिका मालकी हक्काने विनामूल्य दिल्या जाणार.
▪️ ना. म. जोशी मार्ग परिसरात १३.४९ एकर जागेवर ३२ बीडीडी चाळी होत्या. त्यामध्ये २,५६० निवासी आणि अनिवासी गाळेधारकांचा समावेश.
▪️ पहिल्या टप्प्यात एकूण सात विंग आणि एका हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम नियोजित.
▪️ उर्वरित चार विंगमधील ६८४ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची म्हाडाची माहिती.
▪️ दुसऱ्या टप्प्यातील १५ चाळींमधील १,२०० गाळेधारकांची अंतिम पात्रता निश्चित.
▪️ ऑगस्ट २०२६ पासून पात्र निवासी आणि अनिवासी गाळेधारकांना दरमहा ३० हजार रुपये संक्रमण भाडे दिले जात आहे.
▪️ संपूर्ण प्रकल्पात हॉस्पिटल, वेलफेअर सेंटर, पार्किंग, सौर ऊर्जा आणि पर्जन्यजल संचयनासारख्या सुविधा उपलब्ध होणार.
▪️ पुनर्वसित इमारतींमधील सामायिक सुविधांची १२ वर्षे म्हाडाकडून देखभाल केली जाणार.
हिंगोली पालिकेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांच्यासह नगरसेवक व कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला आहे, हिंगोलीच्या डिग्रस गावात जलशुद्धीकरण यंत्राची पाहणी करण्यासाठी हिंगोली पालिकेचे अधिकारी कर्मचारी नगरसेवकांसह पोहोचले होते यावेळी हा हल्ला करण्यात आला आहे दरम्यान या घटनेत पालिका मुख्याधिकांसह नगरसेवक व कर्मचारी मिळून सात ते आठ जण जखमी झाले आहेत, या घटनेची माहिती मिळताच हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत जखमींची विचारपूस केली आहे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर पळसनेरजवळ सिनेस्टाईल दरोडा पडला. सुरतच्या कुरिअर कंपनीची पैसे घेऊन जाणारी कार पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी अडवली. लोखंडी पाईपने कारच्या काचा फोडत सुनील पटेल आणि शैलेशभाई पटेल या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात फूट पाडण्यासाठी सरकारकडून महिला आणि लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात असून आणखी चार बॉम्ब टाकणार, अनेकांची नावे उघड करणार, असा इशारा त्यांनी दिला.
पुणेकरांना अल्प दरात पार्किंग सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने पार्किंगचे दर निश्चित केले आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. पालिकेने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पालघरमधील वाढवण बंदराविरोधात स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले असून वाढवण समुद्रकिनाऱ्यालगत पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी जनआक्रोश मोर्चातून बंदराचे काम बंद करण्याचा इशारा देऊनही काम सुरूच असल्याने स्थानिकांनी आंदोलन केले.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली असून उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विखे-थोरात विरुद्ध खासदार नीलेश लंके असा सामना रंगला आहे. खासदार नीलेश लंके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपचे राहुल शिंदे यांच्यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ताकद लावली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असेल. तर नोटीस टप्पा आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
नंदुरबार जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी...
न्यायालय परिसर रिकामा करत पोलिसांचा कसून तपास सुरू.....
स्फोट घडवण्याची धमकी निघाली केवळ अफवा...
पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची तपासणी....
राज्यातील 14 न्यायालयांना आले धमकीचे मेल
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले. सांगली-मिरज शहरात जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोरच शुभेच्छांचे भलेमोठे फलक लावण्यात आले.
शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले आहे
दोन दिवस सतत खोखला असल्यामुळे एडमिट करण्यात आले आहे
मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठकीला सुरवात
अमित शाह यांना भेटून आल्यानंतर सर्व नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोहोचले
छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ बैठकीला उपस्थित
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी होतं असलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी
- IED बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त
- धमकीचा ई-मेल मिळताच जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे तातडीचे आदेश
- जिल्हा न्यायालय, जुने जिल्हा न्यायालय, DLSA इमारत आणि सर्व बार रूम तात्काळ रिकाम्या करण्याचे निर्देश
- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश आर. अग्रवाल यांच्याकडून आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई : इम्रान खान यांना बिनशर्त माफी मागावी लागेल, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात केवळ हमीपत्र सादर करून प्रश्न सुटणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. संबंधित प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने ही भूमिका मांडली. त्यामुळे आता इम्रान खान नेमकी काय भूमिका घेतात आणि बिनशर्त माफी मागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे सत्र न्यायालय बॉम्बने उडून देण्याची धमकी
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणारे जिल्हा सत्र न्यायालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी
पुणे सत्र न्यायालय मधून सगळे नागरिकांनी वकील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जमा
तपासणीसाठी सत्र न्यायालय केलं खाली
न्यायालयाची तपासणी करण्यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल
बॉम्ब ने उडवून देण्याचा आला न्यायालयाला ईमेल
रायगड : माणगाव पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत २५ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि वाहनांसह तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. माणगाव शहराजवळील ढालघर फाटा येथील एका इमारतीत पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यापूर्वी गणेशोत्सवापूर्वीही याच अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही हितेन छेडा याने जुगार अड्डा सुरू ठेवल्याने पोलिसांनी पुन्हा कारवाई केली.
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्हा न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला असून, न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.
न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी सुरू आहे.
अंधेरी पश्चिमेतील एस.व्ही.पी. नगर म्हाडा परिसरातील अॅस्ट्रोस हॉटेलमध्ये वर्सोवा पोलिसांच्या एटीसी पथकाने कारवाई केली. हॉटेलच्या रूम क्रमांक १०४ मध्ये एमडी (मेफेड्रॉन) विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला.
या कारवाईत आरोपींकडून १५५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ७ लाख ७५ हजार रुपये आहे. याशिवाय दोन्ही आरोपींकडून दोन आयफोनही जप्त करण्यात आले. फॉरेन्सिक टीम आणि दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
दिंडोशी न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धमकीनंतर पोलिसांकडून संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क असून, पुढील तपास सुरू आहे.
न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून बॉम्बचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून, सायबर पोलिसांकडून ई-मेलची तपासणी सुरू आहे. या ई-मेलमध्ये कितपत तथ्य आहे, याचाही तपास केला जात आहे. लवकरात लवकर न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता राखावी आणि न्यायालय परिसरात थांबू नये, असे आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीचे प्रभारी विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीची जबाबदारी मिळाल्याबद्दल विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काम करण्याची तयारी दर्शवली, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये रस्ता खोदण्याचे काम सुरू असताना पीएनजी गॅस पाइपलाइन फुटून दुर्घटना घडली. पाइपलाइन फुटल्यानंतर आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
नंदुरबारमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून संघटनेचे आंदोलन सुरू असून, उसाने भरलेले ५०० ते ६०० ट्रॅक्टर रोखून धरण्यात आले आहेत. साखरेचा भाव ६५ रुपये असताना उसाला ३ हजार १०० रुपये दर का, असा सवाल उपस्थित करत ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार न्याय्य दर देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. तातडीने बैठक न बोलावल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी सरकारला दिला आहे.
हिंगोली येथील न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे.
सातारा न्यायालयानंतर आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. ई-मेल मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी न्यायालय परिसरात दाखल झाले असून, संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यायालयाबाहेर काढण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर अॅक्शन मोड घेतला आहे. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते भवानी चौक परिसरात स्वच्छता स्पेशल ड्राइव्हअंतर्गत पाहणी दौरा करण्यात आला. या मोहिमेदरम्यान संपूर्ण परिसरात डीप क्लिनिंग करून स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली.
शहरातील रस्ते आणि पदपथ स्वच्छ ठेवण्यासोबतच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटविण्यावरही भर देण्यात आला. रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत ताकीद देण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाईदेखील करण्यात आली.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या ११ पैकी तब्बल १० जागा विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूक होत असलेल्या उर्वरित जागांवरही सहकार पॅनलचेच वर्चस्व राहील, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर पारनेरची जागाही आम्हालाच मिळेल, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
अग्रीम मदत म्हणून 5 हजार रुपये जमा
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला यासह परिसरातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने सुरू आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकाला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड व पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. आगामी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले असून, पावसाच्या सातत्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरन्यायधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दंडाधिकाऱ्यांना (मॅजिस्ट्रेट) कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले
ई-मेलद्वारे न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी...
न्यायालयाची इमारत रिकामी, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल...
जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी वकील न्यायाधीश यांना न्यायालयाची इमारत रिकामी करण्याचे आदेश..
सातारा पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल..
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेचे चित्र बिनविरोध निवडीच्या गणितामुळे स्पष्ट झालंय.मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांची निवडणूक जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लक्षवेधी ठरली आहे.. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर,असा संघर्ष पाहायला मिळाला आहे..पडळकरांची जिल्हा बँकेत एंट्री रोखण्यासाठी जयंत पाटलांची रणनीती पाहायला मिळाली आहे.. त्यामुळे जयंत पाटलांची रणनीती पडळकर कशी भेदणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे..
बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला असून गेल्या सहा तासांमध्ये 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बारामती भिगवण रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र बारामती ते नगरसेवक, पोलीस प्रशासन यांनी ही वाहतूक सुरळीत केली.
नाशिकच्या येवला शहरासह तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. विंचूर चौफुली परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
मुंबईतील बहुचर्चित किनन सॅन्टोश आणि रूबेन फर्नांडिस दुहेरी हत्याकांडाचा निकाल गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाचे वाचन पूर्ण न झाल्याने उच्च न्यायालयाने सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे. २०११ मध्ये मैत्रिणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने किनन आणि रूबेन यांची चौघांनी हत्या केली होती. या घटनेनंतर मुंबईत ईव्ह टीझिंगविरोधात मोठी आंदोलने झाली होती.
बीडमधील एका उच्चशिक्षित व्यापाऱ्याला 'टँगो' ॲपवर ओळख झालेल्या दोन तरुणींनी खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या दोघींनी व्यापाऱ्याकडून बँक खाती आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे तब्बल ४७ लाख रुपये उकळल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत या दोन नेपाळी महिलांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इरई धरणाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी.
धरणात सध्या ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध.
चंद्रपूर शहरात पाणी कपात न करण्याची आमदारांची मागणी.
पुढील दोन वर्षांचा विचार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे प्रशासनाला आवाहन.
पुणे शहरात आज पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर एकीकडे पाणी साचलेले असताना दुसरीकडे आता वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळते. पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.एकीकडे पावसाने दिलासा दिलाय दुसरीकडे रस्त्यावर पाणी साचले आहे
कुख्यात गुंड वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावर महिलेचा विनयभंग आणि पिस्तुल लावून धमकावल्या प्रकरणी सोलापूर मध्ये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. अशातच सोशल मीडियावर त्याच्या कमरेला पिस्तुल लावलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या पुर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याच्याकडे परवाना नसल्याचा दावा केला होता.
गुंड कराडच्या दहशत माजवणाऱ्या या मुलावर पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत असुन पोलीसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सुनेच्या त्रासाला कंटाळून एका सासऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे घडला आहे.याप्रकरणी सुनेसह तिघांच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. वीस लाखांची मागणी करत बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने विश्वास फाटक वय वर्ष 63 यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.वडिलांच्या आत्महत्या प्रकरणी ऋषिकेश फाटक याने पत्नी संजना पवार आणि तिच्या वडीलांसह तिघा नातेवाईकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.. याबाबत अधिक तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत, मात्र सुनेच्या त्रासामुळे सासरयाने केलेल्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
लहान असो, की मोठी, बागेत फुलांच्या ताटव्यांवर बागडणारी फुलपाखरे प्रत्येकाचेच लक्ष वेधतायेत..... असचं काहीस रंगीबेरंगी फुलपाखरांचे अनोखे विश्व आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील फुलपाखरांचे भावविश्व खास साम'च्या प्रेक्षकांसाठी.. अलीकडे फुलपाखरं सुरेखच असतात, त्यांच्याकडे बघतच राहावं, असं कुणालाही वाटतं.. मात्र, आजच्या काळात वाढते शहरीकरण आणि प्रदूषणामुळे फुलपाखरांच्या अस्तित्वावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाये.. अशातच अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रंगीबेरंगी फुलपाखरांचे अनोखे विश्व पाहायला मिळाले
आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात जायकवाडी कालवा समितीची बैठक पार पडणार आहे.या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून 3 रब्बीसह 2 उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय घ्या अन्यथा मराठवाडयासाठी पाणी सोडू देणार नाही हा तुमचा इगो मोडून टाकू असा ईशारा जालन्यातील भाजपचे नेते आणि घनसावंगी विधानसभा प्रमुख सतिष घाटगेंनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना दिलाय.जायकवाडीतून आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागत असून धरणात पाणी असूनही आम्हाला हक्काचं पाणी का देत नाही,नगर,नाशिक जिल्ह्यातील धरणातून शेतकऱ्यांना आवर्तनं कशी देता असा सवाल सतिष घाटगेंनी राधाकृष्ण विखेंना केलाय.शिवाय जायकवाडीतून आवर्तने न दिल्यास मराठवाडा पेटून उठेल याला विखे जबाबदार असतील असा ईशारा देखील घाटगेंनी दिलाय.
माढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त तुळशी गावाच्या दुष्काळ निवारण आणि जलसंवर्धनाच्या कामासाठी सोलापूरच्या लोकमंगल समूहाने पुढाकार घेतला आहे.
लोकमंगल समूहाचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांनी तुळशी येथे तीन एकर क्षेत्रावर बंधाऱ्याचे काम सुरू केले असून या कामासाठी जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
काल झालेल्या पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण
काल जवळपास दीड तास पडलेल्या पावसानं कापलेल्या भात शेतीचे नुकसान
दुष्काळातून वाचलेली भातशेती शेतकऱ्यांनी कापली, मात्र कापलेली भात शेती अवकाळी पावसामुळे भिजली
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान
बारामती शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू आहे.
बारामती-भिगवण रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
रायगड जिल्ह्यात शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा बिनसले.....
आमदार थोरवे यांची सुनील तटकरे यांच्या वरती जहरी टीका...
टोरंट प्रकल्प नको हवा असेल तर अगोदर सरकारमधून बाहेर पडा
कर्जत तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात
मुरुसु चक्रीवादळाचा फटका
सुजय विखे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क...
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सुजय विखे यांनी केले मतदान...
राहाता येथील मतदान केंद्रात सुजय विखेंनी बजावला मतदानाचा हक्क...
सहकारात निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा असते
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आर्थिक व्यवहारांची धक्कादायक माहिती समोर.
हल्ल्यासाठी पैसे पुरवण्यासाठी तब्बल ३० बँक खात्यांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय.
वॉन्टेड आरोपी अनिल पंडितने छोट्या-छोट्या रकमांमधून पैसे ट्रान्सफर करून मूळ स्रोत लपवल्याचा संशय.
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये चियाच्या दरात घसरण झाली असताना आवकेत वाढ झाल्याचे चित्र आहे.
वाशिम बाजार समितीत शनिवारी चियाला १८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.
लसूण ३२० रुपये किलोवर कांद्याचे दरही ४० रुपयांवरून ७० वर
गृहिणींच्या स्वयंपाकघरातील फोडणी महागली
मंत्री संजय राठोड यांनी दिला कारवाईचा इशारा
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
यवतमाळमध्ये साम टिव्हीचा इम्पॅक्ट
दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे एसटी विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन
पुणे एसटी विभागाकडून आत्तापर्यंत 300 बसचे आरक्षण फुल झाल्याची माहिती
मराठवाडा,विदर्भ,खानदेश सह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बसचे नियोजन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज देवगिरी येथे बैठक
पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या करावा बाबत आत्मचिंतन बैठक असल्याची सूत्रांची माहिती
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचा झालेला पराभव याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती
तसेच गोकुळ निवडणुकीबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती
- विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपचे आज पासून जनजागरण अभियान
- 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पदयात्रेने होणार समारोप
- राज्य शासनाकडून स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले...
- शाळांसाठी जमिनीची लीज ३० वर्षांऐवजी आता २० वर्षांची असणार आहे..
- शाळांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि इमारतीच्या सुरक्षिततेचे निकष नव्याने निश्चित केलं जाणार आहे.
- वर्धमाननगरातील भीषण आगीत सात गोदामे जळून खाक झालीय.. सुमारे 4 कोटीचे नुकसान
- स्मॉल फॅक्टरी परिसरात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली..
- प्लास्टिक पोत्यांमुळे आगीने काही क्षणांतच घेतले रौद्र रूप केले होते..
- या आगीत कपडे, कार्पेट, जोडे, चप्पल आणि विविध साहित्याच्या गोदामांना आग
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.