July 1 New Rules : आज शेवटची संधी! आयकर, LPG सबसिडी, पासपोर्ट आणि रेल्वे प्रवासाशी संबंधित ही महत्त्वाची कामे लगेच पूर्ण करा

Financial Changes July 2026 : 30 जून ही आयकर, LPG सबसिडी ई-केवायसी, पासपोर्ट अर्ज संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. १ जुलैपासून अनेक नवे नियम लागू होणार आहेत.
July 1 New Rules
July 1 New Rulesgoogle
Published On

आज ३० जून असल्यामुळे आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडे शेवटची संधी आहे. या कामांकडे दुर्लक्ष केल्याने पुढच्या काळात जास्त खर्च, दंड किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे १ जुलैपासून काही नवे नियम लागू होणार आहेत. त्याचा परिणाम आयकरदाते, LPG ग्राहक, पासपोर्ट अर्जदार आणि रेल्वे प्रवाशांवर होणार आहे.

आर्थिक वर्षाशी संबंधित कामांमध्ये आयकर विभागाची प्रोसेस महत्त्वाची आहे. ज्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर रिटर्न भरला आहे. त्यांच्यासाठी ३० जून ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. आयकर विभागाला काही प्रकरणांमध्ये रिटर्नची पडताळणी करण्यासाठी नोटीस जाहीर करण्याचा अधिकार आहे. रिटर्नमधील माहिती आणि विभागाच्या नोंदींमध्ये काही चूक दिसेल तर नोटीस पाठवली जाते. त्यामुळे कोणतीही नोटीस आली असेल तर तीला वेळेत उत्तर द्या.

July 1 New Rules
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ५ मोठ्या मागण्या; जुलैमध्ये होणार मोठा निर्णय

LPG सबसिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅसचे ग्राहक असल्यास आणि सबसिडी मिळत असेल तर ३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला भविष्यात सबसिडी मिळण्यात बऱ्याच अडचणी येऊ शकतात.

तसेच १ जुलैपासून पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन पासपोर्ट किंवा नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर आजच अर्ज करणं फायद्याचं ठरू शकतं. नव्या दरांनुसार ३६ पानांच्या पासपोर्टसाठी २५०० रुपये आणि तत्काळ सेवेसाठी ५००० रुपये शुल्क आकारले जातील.

याशिवाय रेल्वे प्रवाशांसाठीही नियम लागू होत आहेत. १ जुलैपासून विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करणाऱ्यांवरील किंमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करताना योग्य तिकीट घेणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

July 1 New Rules
PF Withdrawal Rule: EPFO 3.0 मुळे पीएफ काढणं सोपं झालं , पण रिटायरमेंटआधी सतत पैसे काढल्याने होईल नुकसान; वाचा सविस्तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com