PF Withdrawal Rule: EPFO 3.0 मुळे पीएफ काढणं सोपं झालं , पण रिटायरमेंटआधी सतत पैसे काढल्याने होईल नुकसान; वाचा सविस्तर...

Employee Provident Fund: EPFO 3.0 मुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया जास्त सोपी होणार आहे. पण रिटायरमेंटआधी पीएफमधून पैसे काढल्याने चक्रवाढ व्याजाचा फायदा कमी होतो.
PF Withdrawal Rule
PF Withdrawal Rulegoogle
Published On

नोकरी करणाऱ्या लाखो कर्माचाऱ्यांसाठी EPFO 3.0 ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट ठरू शकते.कारण प्रत्येक कर्मचारी त्याचा पगारातला काही भाग हा पीएफ म्हणून जमा करत असतो. त्याने भविष्यात रिटायरमेंटनंतर आर्थिक मदत होते. त्यातच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सेवांमध्ये डिजिटल बदल करण्याच्या तयार आहे. त्याने पीएफ काढण्यासाठी तुमची धावपळ कमी होईल. तुम्हाला सतत बँकांच्या फेऱ्यामाराव्या लागणार नाहीत. पण ही जमा रक्कम तुम्ही कोणत्या वेळेत काढली पाहिजे? याचा विचार आत्ताच करणं योग्य ठरेल.

पीएफ काढण्याचे नियम

काही प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार, पात्र सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातली ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम ATM सारख्या सुविधांच्या मदतीने तुम्ही सहज काढू शकता. ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक असली तरी आर्थिक तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कारण PF खातं फक्त बचत खातं नसून रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार आहे.

PF Withdrawal Rule
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा ₹1500 चा हप्ता नेमका कधी येणार? तारीख समोर

बऱ्याच कर्मचाऱ्यांना वाटतं की त्यांच्या पगारातून आणि नियोक्त्याकडून जमा होणारी सर्व रक्कम PF खात्यात जाते. पण तसं नसतं. नियोक्त्याच्या पगारातला काही भाग कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केला जातो. त्यामुळे PF आणि पेन्शन हे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत.

तज्ज्ञांच्या मते, PF मधून सतत पैसे काढल्याने सर्वात मोठं नुकसान चक्रवाढ व्याजाचं होतं. काढलेली रक्कम पुढचे अनेक वर्षे व्याज मिळवू शकत नाही. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी उपलब्ध होणारा निधी कमी होऊ शकतो. जे करिअरच्या सुरुवातीच्या काळात पैसे काढतात त्याचा परिणाम जास्त मोठा असतो.

EPFO 3.0 मुळे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी होणार असली तरी याचा अर्थ गरज नसताना PF वापरणं असा होत नाही. गरजेच्यावेळी PF चे पैसे वापरता येतात. पण जास्तीचा खर्च किंवा खरेदीसाठी हे पैसे वापरणं भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून PF मधून पैसे काढण्याचा निर्णय घेण्याआधी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की, "मला हे पैसे आज खरोखरच गरजेचे आहेत का, की रिटारमेंटनंतर त्यांची जास्त गरज लागणार आहे?"

PF Withdrawal Rule
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ५ मोठ्या मागण्या; जुलैमध्ये होणार मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com