

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे.जून महिन्यात लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला होता.पण जून महिना संपायला फक्त दिवस शिल्लक असून सुद्धा जून महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात आलेला नाही. त्यामुळे खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? असा प्रश्न राज्यभरातल्या लाडक्या बहिणींना पडला आहे. पण या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.
जून महिन्याचा हप्ता अजुनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, सामाजिक माध्यमांवरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जातेय. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यात म्हणजेच १२ ते १५ जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारकडून लाभार्थींच्या अर्जांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली. या प्रक्रियेत अपात्र आणि निकषांमध्ये न बसणारे अनेक अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया जास्त वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये याआधी काही महिन्यांचे हप्ते एकत्र सुद्धा लाडकीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही निधी वितरणात काही दिवसांचा उशीर झाल्याने महिलांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनातल्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे. निधी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा केला जाणार आहे. पण या संदर्भात अजुन कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.