Vande Bharat: आता तिकीट कन्फर्म! पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल; रेल्वे प्रशासनाचा काय आहे प्लॅन? वाचा

Vande Bharat Train: पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेत रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
PUNE-NAGPUR VANDE BHARAT TRAIN TO GET 8 MORE COACHES; CONFIRM TICKETS LIKELY SOON
PUNE-NAGPUR VANDE BHARAT TRAIN TO GET 8 MORE COACHES; CONFIRM TICKETS LIKELY SOONSaam Tv
Published On
Summary
  • पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता दुप्पट करण्याचा प्रस्ताव तयार.

  • सध्याच्या ८ डब्यांसोबत आणखी ८ डबे जोडण्याची योजना.

  • वाढत्या प्रवासी गर्दीमुळे प्रतीक्षा यादीचा प्रश्न निर्माण झाला होता.

पुणे-नागपूर (अजनी) वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मिळणारा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडीची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. सध्याच्या आठ डब्यांमध्ये आणखी आठ डबे जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला येणार आहे. याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

PUNE-NAGPUR VANDE BHARAT TRAIN TO GET 8 MORE COACHES; CONFIRM TICKETS LIKELY SOON
Vande Bharat Sleeper Train: १२० वंदे भारत स्लिपर येणार; पहिलं प्रोटोटाइप या महिन्यात येणार, वाचा लेटेस्ट अपडेट

राज्यातील पुणे आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस १० ऑगस्ट २०२५ रोजी मध्ये सुरू करण्यात आली. सुरूवातीपासूनच या ट्रेनला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुतांश फेऱ्यांमध्ये आसनक्षमता पूर्ण भरत आहे. सुट्ट्यांचा हंगाम, सणासुदीचे दिवस आणि आठवड्याच्या अखेरीस या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण होत असते. अनेक प्रवाशांना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी सातत्याने केली जातेय.

PUNE-NAGPUR VANDE BHARAT TRAIN TO GET 8 MORE COACHES; CONFIRM TICKETS LIKELY SOON
Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासात; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

प्रवाशांची वाढती संख्या आणि आरक्षणातील ताण लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाने ट्रेनमधील डब्यांची संख्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या ट्रेनला आठ डबे असून आता वंदे भारत एक्स्प्रेस १६ डबे करण्यात यावे असा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयामार्फत रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाला तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मंजुरीनंतर आवश्यक तांत्रिक आणि परिचालन प्रक्रिया पूर्ण करून अतिरिक्त डबे जोडले जातील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

डब्यांची संख्या वाढल्यानंतर एकाच वेळी दुप्पट प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सणासुदीच्या दिवशीही प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com