Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासात; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Nashik Bullet Train : जपानच्या सहकार्याने नाशिक मुंबई-अहमदाबाद-हैदराबाद बुलेट ट्रेन नेटवर्कमध्ये सामील होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन नाशिकच्या वाइन, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाला गती मिळेल.
Nashik Bullet Train :
Nashik bullet train connectivity latest updatesaam tv
Published On
Summary
  • नाशिकला अहमदाबाद-मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन नेटवर्कशी जोडण्याचा प्रस्ताव.

  • मुंबई, पुणे आणि हैदराबादचा प्रवास अवघ्या दीड-दोन तासांत शक्य होणार.

  • जपानी संस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता.

जपानच्या पुढाकाराने नाशिक-पुणे बुलेट ट्रेनला चालना मिळणार आहे. जपानच्या सरकारच्या सहकार्याने सुरू असलेल्या अहमदाबाद-मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाशी आता नाशिकही कनेक्ट होणार आहे. या प्रकल्पाच्या मुख्य मार्गाला नाशिक फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या दीड-दोन तासांत गाठणे शक्य होणार आहे. (Nashik bullet train connectivity latest update)

Nashik Bullet Train :
Vande Bharat Train: मुंबई ते शिर्डी; वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना कसं वाटलं?

जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी आणि ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान’ यांच्या पुढाकाराने नाशिकला ‘हायस्पीड रेल्वे’ नेटवर्कशी जोडण्याच्या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांसोबत उच्चस्तरीय जपानी सल्लागार टीमने महत्त्वाची बैठक केली. प्रभारी आयुक्त अमित रंजन यांच्यासोबत जपानी शिष्टमंडळाच्या बैठकीत नाशिकला अहमदाबाद-मुंबई-हैद्राबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाशी जोडणाऱ्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले.

या प्रकल्पामुळे नाशिकचे तर संपूर्ण अर्थचक्र बदलून जाणार आहे, अहमदाबाद- मुंबई- पुणे- हैदराबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) विस्तारीकरण प्रकल्पाचा थेट फायदा आता नाशिकला होईल. या प्रकल्पाच्या मुख्य मार्गाला नाशिक फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येईल. या रेल्वे मार्गामुळे नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या दीड ते दोन तासाच्या संपर्कात येणार आहेत.

वाइन, कृषी उद्योगाला चालना मिळेल

नव्या कनेक्टिव्हिटीचा फायदा नाशिकमधील कृषी प्रक्रिया उद्योग, वाइन टुरिझम, औद्योगिक कॉरिडोर आणि जलद मालवाहतुकीला होणार आहे. यासह पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे नाशिकमधील हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि स्थानिक गाइडच्या व्यवसायात मोठी उलाढाल होणार आहे. सोबतच द्राक्ष, कांदा आणि इतर नाशवंत शेतमाल जलदगतीने मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com