Vande Bharat Train: मुंबई ते शिर्डी; वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना कसा वाटला?

Devendra Fadnavis Vande Bharat Train Journey: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. ते मुंबईवरुन ट्रेनने शिर्डीला गेले. त्यांनी इतरांसमोर आपल्या कृतीतून उदहारण ठेवलं आहे. आपल्या या ट्रेन प्रवासाच्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगितलं.
Devendra Fadnavis  Vande Bharat Train Journey
Mumbai to Shirdi Vande Bharat journey by Maharashtra CMsaam tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईहून अहिल्यानगरला जाण्यासाठी त्यांनी वाहनांचा ताफा सोबत न घेता रेल्वेतून प्रवास केला. हा प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत ट्रेनने मुंबई ते शिर्डीपर्यंत प्रवास केला. या प्रवासाबद्दल त्यांनी आपला अनुभव देखील सांगितला.

“वंदे भारत ट्रेन ही नवं भारताची एक अनुपम भेट पंतप्रधान मोदींनी दिली आहे. जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत, तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे. आज मी याच ट्रेनने मुंबईवरुन साईनगर शिर्डीला आलो. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. रस्त्यात फाईल्सची कामं करता आली. मला आजचा प्रवास लाभदायी वाटला” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार, आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते शिर्डी प्रवास कारऐवजी ट्रेनने केला. (CM Devendra Fadnavis praises Vande Bharat train facilities)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com