onion, rahuri, swabhimani shetkari sanghatana,  saam tv
महाराष्ट्र

Farmers Protest In Maharashtra : कांद्याचा प्रश्नावरुन आंदाेलन चिघळलं, 'स्वाभिमानी' च्या जिल्हाध्यक्षाला पाेलिसांनी उचललं; नगर-मनमाड रस्त्यावर आंदाेलकांचा राडा (पाहा व्हिडिओ)

cancel onion export duty : यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar Manmad Highway News : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढीची घोषणा मागे घ्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) वतीने आज (शुक्रवारी) राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर- मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. (Maharashtra News)

कांद्याला प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपये हमीभाव द्यावा यासह जाहीर केले ३५० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागण्या देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग राेखला. यामुळे वाहतुक खाेळंबली.

साम टीव्हीशी बाेलताना आंदाेलकांनी कांद्याला 2410 रुपये दर मान्य नसल्याचे नमूद केले. 40 टक्के निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन न करण्याचे आवाहन शेतक-यांना केले. परंतु आंदाेलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले.

टाका जेलमध्ये आम्हांला

यामुळे पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले. काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आम्हांला जेलमध्ये टाका न्याय मिळणयासाठी प्रसंगी आंदाेलन तीव्र केले जाईल असा इशारा आंदाेलकांनी पाेलिस प्रशासनास दिला.

दरम्यान स्वाभिमानीचे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांना आंदोलन स्थळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात. यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. आंदोलकांनी महामार्गावर झोपून आंदोलन छेडले. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना महामार्गावरून हटवले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT