Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍याला पकडले आहे, मास्टर माईंडचा शाेध सुरू : शंभूराज देसाई

काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन महापुरुषांची बदनामीचा प्रकार घडल्याचे युवकांनी देसाईंना सांगितला.
chhatrapati shivaji maharaj, social media, shambhuraj desai, satara.
chhatrapati shivaji maharaj, social media, shambhuraj desai, satara. saam tv
Published On

Shambhuraj Desai News : समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणा-या अल्पवयीन मुलास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारा काेणी मास्टर माईंड असेल तर त्याला शाेधून काढू असे आश्वासन आज (गुरुवार) पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवप्रेमींना सातारा (Satara) येथे दिले. (Maharashtra News)

chhatrapati shivaji maharaj, social media, shambhuraj desai, satara.
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला. याचा आज हजाराे युवकांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर रास्ता राेकाे आंदाेलन करुन निषेध नाेंदविला.

chhatrapati shivaji maharaj, social media, shambhuraj desai, satara.
Jaysingpur Crime News : फिल्मी स्टाइल अपहरणाने काेल्हापुरात 'सत्या'ची चर्चा, ज्वेलर्सच्या मालकसह पुतण्याचा शाेध सुरु

यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी तसेच युवकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची काेयना दाैलत या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणा-यावर कठाेर कारवाई केली जाईल असे शिवप्रेमींना आश्वासित केले.

chhatrapati shivaji maharaj, social media, shambhuraj desai, satara.
Pune Metro : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, गुरुवारपासून मेट्राेच्या वेळेत बदल, जाणून घ्या नवा निर्णय

देसाई म्हणाले पदाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनूसार यापूर्वी देखील काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रकार घडला आहे. सायबर विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल. दोन समाजात तेढ निर्माण करणारा काेणी मास्टर माईंड असेल तर त्याला शाेधून काढून त्याच्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल असेही नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com