crop Insurance  saam Tv
महाराष्ट्र

Crop Insurance: शेतकऱ्यांना आला ‘आनंदाचा मेसेज'; ६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आले पीक विम्याचे पैसे

Bharat Jadhav

Beed Farmers Got Crop Insurance:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विमा कंपन्यांनी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवलेत. पीक विमा कंपन्यांनी पीक विमा अग्रीम रक्कम वितरित केलीय. कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी रुपये ७३ लाख रुपये वितरण करण्यास मंजुरी दिली. आज बीड जिल्ह्यातील ६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे २५ टक्के पीकविमा अग्रीमचे २०६ कोटी रुपये जमा झालेत.(Latest News)

दरम्यान दिवाळीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मिळेल. असा शब्द राज्याचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिला होता. तो शब्द आज खरा ठरलाय. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर आलेत. अग्रीम पीकविम्याची रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे किमान १ हजार रुपये याप्रमाणे रक्कम मिळावी, असा नियम आहे. त्यामुळे उर्वरित १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ३५ कोटी रुपयांचे वाटपही लवकरच होणार आहे.

नव्यानेच कृषी मंत्री झालेल्या धनंजय मुंडेंना शेतकऱ्यांना विमा मंजुरीत तांत्रिक अडचणी होत्या. यासाठी मुंडेंनी कृषी विद्यापीठाची मदत घेतली. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या अहवालाचा आधार प्रस्तावाला जोडण्यात आला. यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तीन अधिसुचनांद्वारे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांतील सोयाबीनला विमा अग्रिम मंजुरी दिली.

याचा लाभ जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना होणार होता. मात्र याला कंपनीने विरोध केला. विभागीय आयुक्त आणि राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर कंपन्यांनी या निर्णयाला आव्हान दिले होतं. विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने कंपन्यांनी विमा अग्रिम लागू केला. शेतकऱ्यांना दिवाळीत विमा अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी राज्यातील विविध पीक विमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विमा अग्रिम रक्कम मंजूर करावी, अशा सूचना दिल्या होत्या. कंपनीने शासनाकडे महाडीबीटीमार्फत वितरणासाठी विमा अग्रिमची २४१ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली होती. मात्र दिवाळीमुळे बँकांना सुट्या असल्याने मागील तीन दिवस ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर विमा अग्रिमची रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT