Beed News : बीड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित; राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत निर्णय

Drought declared in Beed district : कालच्या बैठकीत राहिलेल्या 8 तालुक्यातील 52 महसूल मंडळांचा नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आलाय.
Beed News
Beed NewsSaam TV
Published On

Beed News :

ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कालच्या बैठकीत राहिलेल्या 8 तालुक्यातील 52 महसूल मंडळांचा नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आलाय. तर या अगोदर जिल्ह्यातील 3 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते.

यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे आदींसह मदत व पुनर्वसन तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Latest News)

Beed News
Lalit Patil Case : ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील किती पैसे मोजायचा? पोलीस तपासात समोर आलेला आकडा ऐकून डोळे पांढरे होतील

बीड जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या तोंडावरच सर्वच तलाव कोरडे पडतील अशी परिस्थिती आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा अशा अनेक समस्या आगामी काळात जिल्ह्यात उद्भवणार आहेत. जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांचा दुष्काळी म्हणून विचार झाल्याने या भागाला शासनाकडून दुष्काळाच्या मापदंडानुसार मदत मिळणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महसुली मंडळांचा समावेश

आष्टी तालुका – आष्टी, कडा, टाकळसिंग, दौलावडगाव, धामणगाव, पिंपळा, धानोरा

बीड तालुका – पाली, म्हाळसजवळा, नाळवंडी, राजुरी (न), पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणेश, चौसाळा, बीड

गेवराई तालुका – गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा

Beed News
Nandurbar Drought: यंदा नंदूरबार जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती; जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस

केज तालुका– केज, युसूफ वडगाव, ह.पिंप्री, होळ, विडा, बनसारोळा

माजलगाव तालुका– माजलगाव, गंगामसला, किट्टी आडगाव, तालखेड, निथरूड, दिंदरूड

परळी तालुका– परळी, धर्मापुरी, सिरसाळा, नागापूर, गाडे पिंपळगाव

पाटोदा तालुका– पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर

शिरूर कासार तालुका– शिरूर कासार, रायमोह, तींतरवणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com