Drought : शशिकांत शिंदे म्हणाले, अहो आश्चर्यम... वाई, खंडाळा दुष्काळग्रस्त; माण, खटाव, कोरेगाव वंचित

MLC Shashikant Shinde News : सर्व्हे व्यवस्थित हाेणे आवश्यक असल्याचे मत आमदार शशिकांत शिंदेंनी व्यक्त केले आहे.
mlc shashikant shinde
mlc shashikant shindesaam tv

Satara News : दुष्काळग्रस्त भागात चुकीचा सर्व्हे झाल्याचा दावा करीत आमदार शशिकांत शिंदे यांनी चुकीचा सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माण, खटाव, कोरेगाव हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला पाहिजे असेही शिंदेंनी नमूद केले. (Maharashtra News)

mlc shashikant shinde
Pune Market Yard : पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड १ नोव्हेंबरला राहणार बंद

आमदार शशिकांत शिंदे म्हणासे राज्य सरकारच्या वतीने सातारा जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. आश्चर्य हे वाटते की वाई, खंडाळा या सारख्या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मला त्याच्यावर आक्षेप नाही परंतु करण्यात आलेल्या सर्व्हे कशाच्या आधारे आणि कोणत्या निकषांच्या माध्यमातून करण्यात आला असा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

mlc shashikant shinde
Maratha Andolan : आज ताेडगा निघेल! शिर्डी, राहाता, माजलगाव, वडवणीत कडकडीत बंद

आमदार शिंदे म्हणाले सर्व्हे चुकीचा झाला आहे. सर्व्हे करताना ज्यांची चूक झाली अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी. पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली आहे. शेतकरी अडचणीत आहे.

माण, खटाव, कोरेगाव हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला पाहिजे. ज्या ठिकाणी पाऊस नाही अशा भागाचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला पाहिजे. संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त असून संपूर्ण जिल्हा या निकषात बसवण्यात यावा असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा का समावेश झाला नाही याचा प्रशासनाने खुलासा करावा. जर त्रुटी ठेवल्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असेल तर दुर्दैवी गाेष्ट आहे असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

mlc shashikant shinde
Antarwali Sarati News : उदयनराजे भाेसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपाेषण स्थगित करणार? (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com