farmers from maharashtra demands 4 thousand rupees per quintal for onion Saam Digital
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नाफेडचे कांदा भाव निश्चितीचे अधिकार काढले,(पाहा व्हिडिओ)

'नाफेड'कडून या आठवड्याचा कांद्याचा भाव फक्त 2105 रुपये आहे. खासगी व्यापाऱ्याकडे 2650 ते 2700 चा भाव दोन दिवसांपासून आहे. एनसीसीएफच्या भाव देखील तसाच आहे.

अभिजीत सोनावणे

नाफेडने कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. आगामी काळात हाेणा-या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतक-यांना दिलासा द्यावा. आत्ताच्या लाेकसभा निवडणुकीत शेतक-यांचा संताप प्रकर्षाने जाणवल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी नमूद केले. दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफचे कांदा खरेदीचे अधिकार काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले नाफेड आणि 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून पाच लाख टन कांद्याचा बफर स्टाॅक करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले हाेते. त्यासाठी थेट शेतक-यांकडून कांदा खरेदी करावा तसेच किमान तीन ते साडे तीन हजार रुपये दर द्यावा अशी महाराष्ट्रातील शेतक-यांची मागणी हाेती. परंतु तसे काेणत्याही कांदा खरेदी केंद्रावर दिसले नाही.

सध्या नाफेड कांद्याला देत असलेला भाव 2 हजार रुपये देत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. नाफेडने 4000 रुपये दराने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोड ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT