Shreya Maskar
भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन मुंबई, पुणे, दिल्लीत नाही तर पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगालमधील हावडा जंक्शन हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे.
हावडा जंक्शन रेल्वे स्थानक 1854 मध्ये सुरू झाले. हावडा-हुगली दरम्यान पहिली प्रवासी ट्रेन येथूनच धावली होती.
हावडा जंक्शन पश्चिम बंगालमधील हुगळी नदीच्या काठावर आहे. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे आहे.
हावडा जंक्शन हे १९व्या शतकातील ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. या स्टेशनवरून सर्वाधिक गाड्यांची ये-जा होते. हे सर्वात जुने रेल्वे स्टेशन देखील आहे.
हावडा जंक्शन हे भारतातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म (जवळपास 23) असलेले सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. येथे 26 हून अधिक ट्रॅक आहेत. दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी येथे प्रवास करतात. शेकडो गाड्या पळतात.
भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस 3 मार्च 1969 रोजी हावडा आणि नवी दिल्ली दरम्यान सुरू झाली. ही अतिवेगवान ट्रेन होती. तिने सुमारे 1,450 किमी अंतर 17 तास 20 मिनिटांत कापून दिल्ली ते कोलकाता प्रवास सोपा केला.
हावडा जंक्शन प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक बनवण्यात आले आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष व्हीलचेअर, सामानासाठी क्लॉक रूम उपलब्ध आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.