Shreya Maskar
मसूर डाळीतील गुणधर्म मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचेला एक नवीन चमक देते. मसूरमध्ये असलेले नैसर्गिक ब्लीचिंग घटक चेहऱ्यावरील डाग आणि टॅन कमी करतात.
मसूर डाळ जास्त तेल शोषून घेते आणि त्वचेला मॅट फिनिश देते. मसूरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा कोमल आणि मुलायम ठेवतात.
मसूर डाळीचा फेस पॅक चेहऱ्याला नियमित लावल्याने त्वचेचा रंग उजळतो. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. तुम्हाला मऊ कापसासारखा चेहरा मिळतो.
मसूर डाळीचा फेस पॅक बनवण्यासाठी मसूर रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी बारीक वाटून घ्या करा. एका बाऊलमध्ये ही पेस्ट काढून यात दूध आणि काही थेंब गुलाबपाणी घालून मिक्स करा.
मसूर डाळीचा फेस पॅक चेहरा आणि मानेला लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा आणि मान स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहरा चांगला मॉश्चराइज करा.
तुम्ही मसूर डाळीचा स्क्रबही बनवू शकता. मसूर स्क्रब बनवण्यासाठी कोरडी मसूर बारीक करा. त्यात मध,लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट बनवा. या पेस्टने 5-10 मिनिटे चेहऱ्याला चांगले स्क्रब करा.
मसूर स्क्रब त्वचेला नैसर्गिकरित्या मऊ, उजळ बनवते. चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत करते. त्वचेला पोषण देते. महिन्यातून 4-5 वेळा हे नक्की करा.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.