धुळे जिल्ह्यातील कुरखळी गावात ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.
अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक वाया गेल्याने नैराश्यात शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला.
सहा दिवसांत शिरपूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
अति पावसाने कापसाचे पीक वाया गेल्याने नैराश्येत गेलेल्या कुरखळी येथील एका शेतकऱ्याने शेवटी मृत्यूचा मार्ग पत्करल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात घडली आहे. युवराज काशिनाथ कोळी या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात फवारणीसाठी असलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने केवळ कुरखळी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे, शिरपूर तालुक्यात सहा दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता. कापसाच्या पिकावर यावर्षी सुरुवातीला त्यांनी आपल्या क्षेत्रात कापसाची लागवड केली, परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली, फुलोरा व फळे गळून पडल्याने कापसाचे उत्पादन होणार नाही हे त्याच्या लक्षात आले.
हे स्पष्ट झाल्यावर कर्जाचे ओझे आणि पोटापाण्याची चिंता त्यांच्या मनावर दाटून आली, मुलींच्या लग्न कस कराव ? या नैराश्यग्रस्त अवस्थेत त्यांनी शेतातच फवारणीचे औषध प्राशन करून जीवन संपवले. दरम्यान, सहा दिवसात शिरपूर तालुक्यात ही आत्महत्येची दुसरी घटना आहे. यापूर्वी भाटपूरा येथील एका कर्जबारी तरुण शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सलग दोन वेळा आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सरकारकडून पिकविमा आणि मदतीची आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात मदतीचा हात वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या घरात केवळ अश्रू आणि हतबलतेचे सावट आहे. युवराज कोळी यांच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांकडून शासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.