Snake Tragedy : साप पकडण्याचं धाडस जीवावर बेतलं, जालन्यात ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू

Jalna News : जालना जिल्ह्यात तीस वर्षीय तरुणाने साप पकडण्याचं धाडस केलं मात्र विषारी सापाच्या चाव्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून, सर्पमित्रांनी साप दिसल्यास त्वरित तज्ञांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
Snake Tragedy : साप पकडण्याचं धाडस जीवावर बेतलं, जालन्यात ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू
Jalna NewsSaam Tv
Published On
Summary
  • निरखेडा गावात साप पकडण्याचं धाडस तरुणाच्या जीवावर बेतलं आहे

  • गोविंद हिवाळे नावाच्या तरुणाला विषारी सापाने चावा घेतला आहे.

  • उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

सापाबद्दल अज्ञान असल्याने जालन्यात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. जालन्यातील निरखेडा गावामध्ये साप पकडण्याचं धाडस करताना एका तीस वर्षे तरुणाला सापाने चावा घेतला आहे. यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय. गोविंद हिवाळे अस या तरुणाचं नाव आहे.

गावाशेजारी नदीकाठी या तरुणाला साप दिसला सापाबद्दल ज्ञान नसल्याने या तरुणाने हा साप पकडण्याचं धाडस केलं मात्र हे धाडस या तरुणाच्या जीवावर बेतल. या तरुणाच्या मृत्यूने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. दरम्यान सापाबद्दल ज्ञान नसणाऱ्यांनी साप पकडण्याचा धाडस करू नये असंच या घटनेनंतर म्हणावं लागेल.

Snake Tragedy : साप पकडण्याचं धाडस जीवावर बेतलं, जालन्यात ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू
Pandharpur Flood Alert : पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी भयान अवस्था, पूरस्थितीचा व्हिडिओ

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

जालन्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.सापाबद्दल अज्ञान असल्याने जालन्यात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. जालन्यातील निरखेडा गावामध्ये साप पकडण्याचं धाडस करताना एका तीस वर्षीय तरुणाला सापाने चावा घेतलाय. चावा घेतल्यानंतर या तरुणाला ग्रामस्थांनी उपचारासाठी हॉस्पिटलला नेलं मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Snake Tragedy : साप पकडण्याचं धाडस जीवावर बेतलं, जालन्यात ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, २४ तासात १० जणांचा मृत्यू, अनेकांचा संसार उघड्यावर

असल धाडस करू नका, सर्पमित्राच आवाहन

कुठेही साप आढळला तर त्याबाबत जवळच्या सर्पमित्रांना कळवावं. सापाबद्दल ज्ञान नसताना साप पकडण्याच धाडस करू नका.कधीकधी हे धाडस तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे घरी सापाबद्दल ज्ञान असेल तर साप पकडण्याचा धाडस करावं. या तरुणाला चावा घेतलेला साप अत्यंत विषारी असल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे असल धाडस घरी करू नका असं आवाहन सर्पमित्र गोकुळ लाड यांनी केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com