Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड हटवून शासन अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा
Dharashiv NewsSaam Tv
Published On
Summary
  • धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

  • शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • शासन अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

  • या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतजमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान,घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार जिल्हा अग्रणी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकामार्फत सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर असलेला होल्ड तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान व मदत रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा
Maharashtra Farmer : स्कायमेट वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवले, अकोल्यात २ हजार शेतकऱ्यांचं नुकसान

अलीकडे काही शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस मिळाल्या होत्या.याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,या नोटीस नव्या नसून लोकअदालत,पीक कर्ज नव्याने करणे किंवा तडजोडीच्या संदर्भातील जुन्या नोटीस आहेत.मात्र मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कुठल्याही नवीन नोटीसा देऊ नयेत,अशा कडक सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाकडुन सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, कधी अन् कुठे?

त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये,असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून,कर्ज वसुलीची भीती बाजूला ठेवून आता कुटुंब आणि शेती पुन्हा उभे करण्यासाठी काम करता येईल,अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com